Thursday, September 12, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे निधन...

सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे निधन…

रायगड जिल्ह्यातील अग्रेसर दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांचे नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने नवी मुंबईतील खाजगी रुग्णालयात निधन झालं ते 40 वर्षाचे होते.
मुळचे परभणी येथील असलेले अशोक जंगले कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्जत येथील दिशा केंद्राशी जोडले गेले आणि येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याचा पाया घातला गेला.दीन दुबळ्यांच्या सेवेत त्यांनी त्यांचं आयुष्य वेचल.त्यांच्या निधनाची वार्ता कर्जतमध्ये येताच सारा रायगड हळहळ व्यक्त करत आहे .
आज सकाळी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरचे उद्घाटन उरकल्यानंतर त्यांच्या छातीत कळ आली,लागलीच त्यांना तिथेच ऍडमिट करण्यात आलं व नंतर त्यांना पुढील उपचारासाठी नवी मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले,तिथेच उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जंगले यांच्या निधनाने त्यांचा मित्रपरिवार चाहते शोकसागरात बुडाले आहेत.कुठलीही केस घेऊन दिशा केंद्राची पायरी चढलेल्या माणसाला न्याय देणारे जंगले आज काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page