Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळासामाजिक कार्यकर्ते हाजी इशाक शेख उर्फ (पटेलभाई) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सामाजिक कार्यकर्ते हाजी इशाक शेख उर्फ (पटेलभाई) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते व सुन्नी मुस्लिम जमातचे ट्रस्टी हाजी इशाक मोहिद्दिन शेख उर्फ पटेलभाई यांचे बुधवारी रात्री निधन झाले. लोणावळा सोलापुर प्रवासात त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे.
लोणावळा शहरातील प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात पटेलभाई यांचा सहभाग असायचा. शहरातील वातावरण व जातीय सलोखा राखण्यासाठी ते कायम अग्रेसर असायचे. सलग तीस वर्ष ते सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे ट्रस्टी राहिले.
मोहल्ला कमिटी, जातीय सलोखा समिती असा विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे.कोरोना काळात त्यांनी उत्तम काम करत नागरिकांना सेवा दिली होती. त्याच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. आज गुरुवारी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Advertisment -