Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसामान्यांच्या प्रश्नांसाठी पिंटो गॅस सर्व्हिसला मनसेचा दणका !

सामान्यांच्या प्रश्नांसाठी पिंटो गॅस सर्व्हिसला मनसेचा दणका !

सिलेंडर फुटून जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण मनसेचा सवाल..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत मधील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पिंटो गॅस सर्व्हिस या घरगुती गॅस वितरीत करणाऱ्या कार्यालयाच्या अनेक तक्रारी ग्राहकांच्या सेवेबाबत येत असताना येथील संचालक प्रत्येक वेळी कानाडोळा करत असताना दिसत आहेत.

तर आत्ता नागरिकांच्या जीवनाशी खेळ चालवला असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दंड थोपटले असून सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रदादा पाटील व माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्रदादा निगुडकर यांच्या मार्गदर्शनाने शहर अध्यक्ष समीर चव्हाण तसेच कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक हेमंत ठाणगे यांच्या उपस्थितीत कर्जत पिंटो गॅस सर्व्हिसच्या संचालकांना निवेदन देण्यात आले.नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेभरवशी सेवेत बदल न केल्यास या गलथान कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.


कर्जत तालुक्यातील कर्जत शहर व ग्रामीण भागात पिंटो गॅस सर्व्हिस यांच्या मार्फत जे सिलेंडर पुरवले जातात , त्या सिलेंडरला असलेले वायसर फुगून रेग्युलेटर बसत नाहीत.जर एखाद्याचा रेग्युलेटर बसला पण त्याला कळले नाही की तो नीट बसला आहे की नाही आणि गॅस लीक होऊन जर जबरी अपघात घडून जीवितहानी झाल्यास ह्याला जबाबदार कोण ?

अश्या स्वरूपाच्या नागरिकांच्या तक्रारी वारंवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत शहर यांच्याकडे येत असल्याने या विरोधात १५ दिवसांच्या आत आपण लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास व हा नागरिकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर प्रश्न मार्गी न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने उत्तर देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

असे निवेदन देताना झालेल्या चर्चेत ईशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्जत शहर अध्यक्ष समीर चव्हाण, कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक हेमंत ठाणगे,शहर सचिव चिन्मय बडेकर, कर्जत शहर उपाध्यक्ष रांकित शर्मा, उपाध्यक्ष राजेश साळुंके,महिला शहर उपाध्यक्षा सौ.आकांक्षा सावंत शर्मा, व महाराष्ट्र सैनिक महेश लोवंशी, हितेश ठोसर, अजित राऊत तसेच असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page