Thursday, April 24, 2025
Homeपुणेमावळसायली जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने 150 नागरिकांची आयुषमान विमा कार्ड नोंदणी मोफत...

सायली जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने 150 नागरिकांची आयुषमान विमा कार्ड नोंदणी मोफत…

कार्ला:प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान विमा कार्ड नोंदणीला वेहेरगाव येथे लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नोंदणीचा वेहेरगावातील महिला व पुरुष अशा 150 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान विमा कार्ड नोंदणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्या वतीने मोफत करण्यात आली. सदर विम्यात 5 लाखां पर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती सायली बोत्रे यांनी यावेळी दिली. सदर अभियाना अंतर्गत महिला व पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला 150 नागरिकांनी याचा लाभ घेतला.
या प्रसंगी वेहेरगावचे ग्रामपंचायत सदस्या पूजा अशोक पडवळ,अनिल गायकवाड, मा. सरपंच दत्तात्रय पडवळ, संतोष रसाळ, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सचिव जितेंद्र बोत्रे, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर पडवळ, मा. उपसभापती कल्याणी ठाकर, नाणे मावळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा सीमा आहेर, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास पडवळ,मा. उपसंरपंच ज्ञानेश्वर बोत्रे,तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष निवृत्ती बोत्रे,पांडुरंग बोत्रे,सोमनाथ बोत्रे सह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page