सारसाई विभागात आदिवासींना खावटी योजनेचे वाटप..१३९ आदिवासी बांधवानी घेतला लाभ..

0
269

खोपोली( दत्तात्रय शेडगे )
महाराष्ट्र सरकार कडून आदिवासीना देण्यात येणाऱ्या खावटी अनुदान योजनेला सुरुवात झाली असून पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई विभागातील आदिवासी बांधवाना खावटी योजनेचे वाटप करण्यात आले.

आपटा सारसई विभाग हा बहुतांश आदिवासी बहुल भाग म्ह्णून ओळखला जातो, या भागात बहुतांश आदिवासी लोक राहतात त्यांच्यासाठी सरकार कडून खावटी योजना राबविण्यात येते, त्याचप्रमाणे नुकताच सारसई विभागातील आदिवासी बांधवांना खावटी योजनेचे किट वाटप करण्यात आले.

यावेळी व१३९ आदिवासी बांधवानी खावटी अनुदान योजनेचे किट वाटप करण्यात आले, आपटा ग्रामपंचायतच्या नावनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्या संगीता बावदाणे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मन बावदाने यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.आपटा ग्रामपंचायतच्या सदस्या संगीता लक्ष्मण बावदाने, शिवसेना सारसई शाखाप्रमुख तथा धनगर समाज पनवेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण बावदाने, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लेंडे,पेन प्रकल्प अधिकारी वर्ग ,एस आर ठाकूर, व्ही एन पांढरे, डी एस पाटील, ए जे म्हात्रे झ सी एम म्हात्रे, एम बी उकिरडे, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कांबळे, दत्ता भोईर, राम वाघे, भास्कर ढेबे, लक्ष्मण वाघे आदी उपस्थित होते.