Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसावेळे ग्रामपंचायतीच्या " उपसरपंच पदी " आर पी आय (आ ) पक्षाचे...

सावेळे ग्रामपंचायतीच्या ” उपसरपंच पदी ” आर पी आय (आ ) पक्षाचे शरद सदानंद जाधव यांची बिनविरोध निवड !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीच्या ” उपसरपंच पदी ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते ” शरद सदानंद जाधव ” यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन करून मोठा जल्लोष करण्यात आला . यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यास त्यांचे कुटुंबीय सदस्य , मित्र मंडळी , नातेवाईक , आर पी आय पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते , मित्र पक्ष , सावेळे ग्रामस्थ यांनी एकच गर्दी केली होती.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा संपर्क प्रमुख बाबू शेठ घारे , स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , कर्जत ता. अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे, उपाध्यक्ष चंद्रकांत धनवटे , आर पी आय संघटक तथा उपसरपंच यांचे बंधू विजय जाधव , शिंदे सर , ग्रामविकास अधिकारी अनिल पवार , सरपंच – अण्णा कातकरी , सदस्य – रमेश मुने , पूजा भोईर, अपूर्वा जोगले, आशा मोरे, वहिदा मुल्ला, दिलीप लोट, मनोज पवार , आर पी आय चे माजी ता. महासचिव मनोज गायकवाड , किशोर जाधव , उत्तम गायकवाड , अशोक गायकवाड , त्याचप्रमाणे
शब्बीर मुल्ला, शब्बीर पटेल, हमीद मुल्ला, मुस्ताक मुल्ला, शानू पटेल , रवी जाधव , किरण जाधव , सुरेश जाधव , विलास जाधव ,आदी सावेळे ग्रामस्थ उपस्थित होते.

आई कल्पना सदानंद जाधव व पत्नी सौ. प्रिया शरद जाधव यांनी औक्षण करून सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
- Advertisment -

You cannot copy content of this page