Friday, February 7, 2025
Homeपुणेलोणावळासिंहगड इन्स्टिटयूटमध्ये राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..

सिंहगड इन्स्टिटयूटमध्ये राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..

लोणावळा: सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यांच्या कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पराक्रमी व न्यायनिष्ठ नेतृत्व म्हणून घडवले. त्यांनी केवळ आपल्या मुलासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील समाजासाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. त्यांची जीवनकथा प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरते.
स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या विचारांनी देशातील तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी दिशा दिली आहे. त्यांच्या प्रसिद्ध शिकागो भाषणातील “उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका” या संदेशावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात सिंहगड इन्स्टिटयूटचे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध विभागांचे प्रमुख, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे महत्त्व आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याची शिकवण दिली.
- Advertisment -

You cannot copy content of this page