भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सुधाकर घारे हा चमत्कार घडविणारा नेता असून त्यांचा अपघाती पराभव झाला आहे , असे भावनिक विधान कोकणचे भाग्य विधाते , तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवार दिनांक ०९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वा. कर्जत येथील रॉयल गार्डनच्या भव्य मैदानावर आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात व्यक्त केले . यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपीठावर मा.श्री. सुनिलजी तटकरे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , मा.ना.श्री. नरहरी झिरवळ – मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन , इगतपुरीचे आमदार हिरामण खोचकर , सुधाकर भाऊ घारे – मा. राजिप उपाध्यक्ष , दत्तात्रेय मसुरकर – प्रदेश सरचिटणीस, भगवान शेठ भोईर – प्रदेश प्रतिनिधी, अशोक भोपतराव – प्रदेश सरचिटणीस , भरत भाई भगत – प्रदेश सरचिटणीस ,अंकित साखरे – युवक जिल्हाध्यक्ष, एकनाथ दादा धुळे , नारायण डामसे – मा. समाजकल्याण सभापती , ऍड. रंजना धुळे , दिपक श्रीखंडे , बैलमारे , केतन बेलोसे , देशमुख , पालकर , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला आघाडी , युवती आघाडी , सर्व सेल कमिटी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील तटकरे म्हणाले की , १९९२ पासून माझं या मतदार संघाशी जिव्हाळ्याच नात आहे , येथील कार्यकर्त्यांवर माझं प्रेम आहे , माझ्यावर त्यांनी विश्वास दिला , म्हणून सुधा भाऊंच्या पाठीशी दादा व माझी तसेच राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद आहे , माझा देखील १९८५ साली पराभव झाला , पण मी थांबलो नाही , अनेक ठिकाणी बदल झाला कार्यकर्ते फुटले पण येथील सुई देखील हलली नाही , येथील नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकास ” हुतात्मा वीर हिराजी पाटील ” यांचे नाव देण्यास प्रयत्न करणार , असे आश्वासन त्यांनी दिले . प्रदेश अध्यक्ष असल्याने महायुतीच्या नियमांचे पालन केलं नाहीतर इथला ” रिझल्ट ” वेगळा लागला असता , पण परतफेड कधीना कधी होईलच , असा इशारा देखील त्यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे नाव न घेता दिला . आपला पक्ष वाढवीत असताना आपण देखील कुणाच्या नेतृत्वाखाली काम करत असतो , आजचा दिवस मी कदापि विसरणार नाही , आज ही कार्यकर्त्यांची तेवढीच ताकद दाखवून ” शिव धनुष्य ” तुम्ही पेलले , हे ही विसरता येणार नाही , असे गौरोदगार सुधाकर भाऊ घारे यांच्या बदल काढले . एप्रिल २०२६ पर्यंत ” आदिवासी समाज भवन ” झाले पाहिजे , असे करून दाखवण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना सांगितले , सुधा भाऊंचे कार्यालय खूप भव्य दिव्य तर आहेच तर त्या कार्यालयातून सर्व सामान्य लोकांची कामे होत आहेत , याची जाण आणि जाणीव आम्हाला आहे , तुम्ही नम्र आहात जमिनीवर पाय ठेवून कार्य करा , याचेच पाठबळ तुम्हाला मिळेल , पाठीमागे वळून बघू नका , असा सल्ला देत पुढच्या कार्यक्रमाला येईन तेंव्हा तुमच्या ” आनंदाला उधाण ” येईल अशी घोषणा सुधाकर भाऊ घारे यांच्या नावाची करेन , असे आश्वासित सर्व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी मंत्री नरहरी झिरवळ , सुधाकर भाऊ घारे , एकनाथ धुळे , भरत भाई भगत , अशोक शेठ भोपतराव, सचिन करणूक यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले . तर शेतकरी कामगार पक्ष , शिवसेना शिंदे गट , शिवसेना ठाकरे गट , मनसे , त्याचप्रमाणे इतर कार्यकर्त्यांचा व महिलांचा मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश करण्यात आला .