Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसुधाकर शेठ घारे यांच्या " मिरवणुकीच्या नियोजनाने " राष्ट्रवादीचे नेते भारावले !

सुधाकर शेठ घारे यांच्या ” मिरवणुकीच्या नियोजनाने ” राष्ट्रवादीचे नेते भारावले !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) २२ जेसेपींच्या ताफ्याने ” फुलांची उधळण ” करत कर्जतमध्ये काढलेल्या भव्य मिरवणुकीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे धुरंधर नेते खासदार सुनील तटकरे अत्यंत भारावून गेले.
कर्जत शहरातील पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ” निर्धार सभेस ” उपस्थित रहाताना या क्षणामुळे ४० वर्षांपूर्वीची आठवण प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना झाली , व आपसूकच ते म्हणाले ” सुधा जे ४० वर्षांत कुणाला जमले नाही , ते तुम्ही करून दाखविले “. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका जनसंपर्क कार्यालयाचे ” लोकार्पण सोहळा व निर्धार सभेचे ” आयोजन कर्जतमध्ये राजिप चे मा. उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले होते.
यावेळी पोलीस मैदान खचाखच भरले असताना उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की , सन १९८४ साली मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना कर्जत येथे अंतुले साहेबांच्या सभेस उपस्थित राहिलो असताना त्यावेळी येथील काँग्रेसचे आमदार स्वर्गीय तुकाराम आण्णा सुर्वे यांनी मिरवणूक काढली होती , तशीच ४० वर्षानंतर पुन्हा एकदा सुधाकर घारे यांनी मिरवणूक काढली , असे गौरोद्गार काढून ज्यांना ४० वर्षांत जमले नाही , ते तुम्ही करून दाखवले . पुढे ते म्हणाले की ,जो निर्णय घेवून दादांच्या पाठीमागे तुम्ही राहिलात , याबद्दल तुमचा निर्णय योग्यच होता हि आजच्या गर्दीवरून दिसत आहे . आजची गर्दी फक्त राष्ट्रवादीची आहे , ४३ विधानसभा सदस्य दादांच्या पाठीशी ठाम आहेत.
” मॅन ऑफ कमेंटमेंट ” हे करून दाखविणारे दादा , यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचार पुढे न्यायचे आहेत . यावेळी दरडग्रस्त गावांना मदत करण्याचे दादांना विनंती करण्यात आली . तर राजिपचे उपाध्यक्ष म्हणून सुधाकर घारे यांचे कार्य उल्लेखनीय आहे , अशी प्रशंसा त्यांनी केली . म्हणूनच सुधा तुम्हाला कर्जत खालापूर पुरता मर्यादित न ठेवता तुम्हाला जिल्ह्याचे नेतृत्व करायचे आहे ,असे मत त्यांनी मांडले.

कर्जतला चिंतन शिबिर झालं की , गौरवशाली राजकीय इतिहास सुरू होतो असा आजपर्यंतचा विश्वास आहे , सुधाकर घारे यांनी मांडलेल्या समस्या व कर्जतचां विकास यासाठी भविष्यात नक्कीच मदत केली जाईल , असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले , ही भूमी संतांची तशी स्वातंत्र्य सैनिकाची आहे , या भूमीत सुधाकर तुम्ही २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करता , असे गौरवोद्गार काढले , महाराष्ट्रातील छत्रपतींच्या भूमीत पहिलीच ही निर्धार सभा होत आहे , असे मत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले . यावेळी खालापूर मधील बडे नेते उल्हास भुर्के यांना जिल्हा सचिव पदी नियुक्तीपत्र अजित दादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे , मंत्री आदिती ताई तटकरे , आमदार अनिकेत दादा तटकरे , माजी सभापती प्रमोद हिंदुराव , महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे , कर्जत – खालापूर मतदार संघातील नेतृत्व सुधाकर शेठ घारे यांच्या समवेत , प्रदेश महासचिव अशोक भोपतराव , भरत भाई भगत , शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , तालुका अध्यक्ष भगवान चंचे , जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ दादा धुळे , दत्तात्रेय मसुरकर , कार्याध्यक्ष शिवाजी खारीक , नीगुडकर , विधानसभा अध्यक्ष सौ. पूजा सुर्वे , ता. अध्यक्ष रंजना धुळे , ता. अध्यक्ष स्वप्नील पालकर , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page