
लोणावळा : सुनेचा छळ व विनयभंग करणाऱ्या नवऱ्यासह सासू, सासरा व दीर यांना कोर्टाने एक वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ओळकाई वाडी लोणावळा येथील फिर्यादी मिनल मनिष पटेकर ( वय 33,) यांनी त्यांचे पती मनिष भास्कर पटेकर, सासरा भास्कर रामचंद्र पटेकर, सासू सत्यभामा भास्कर पटेकर, दीर गणेश भास्कर पटेकर, दीर रमेश भास्कर पटेकर हे फिर्यादीचा विनयभंग करून शिवीगाळ व दमदाटी करत असल्याबाबत तक्रार दिली होती.
त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दि.17/05/2017 रोजी गु. र. नं.75/2017 भा द वि का क 498(अ ),354,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार परदेशी व पोलीस हवालदार अजित ननावरे यांच्या कडे देण्यात आला होता.
सदर तपासी अंमलदारांनी आरोपी मनिष भास्कर पटेकर, भास्कर रामचंद्र पटेकर, सत्यभामा भास्कर पटेकर, गणेश भास्कर पटेकर, रमेश भास्कर पटेकर यांना अटक केली होती. हे आरोपी दोषी आढळल्याने मा. न्यायाधीश बुरांडे यांनी दि.20/10/2021 रोजी निकाल दिला त्यानुसार सर्व आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड तर आरोपी गणेश पटेकर यास भा द वी का कलम 354 प्रमाणे 2 हजार रुपये असा एकूण 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार परदेशी व पोलीस हवालदार अजित ननावरे यांनी केला असून सदर खटला सरकारतर्फे आर. एन. विरकूट यांनी वकील म्हणून तर कोर्ट पैरवी म्हणून एस. ए. बोराडे यांनी काम पाहिले आहे.
सदर खटला चालविण्याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी मार्गदर्शन केले.