Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसुरळीत पाणी पुरवठा होण्या साठी माथेरान नगराध्यक्षांची अधिकाऱ्यां बरोबर चर्चा..

सुरळीत पाणी पुरवठा होण्या साठी माथेरान नगराध्यक्षांची अधिकाऱ्यां बरोबर चर्चा..

फोटोलाईन:-माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत गटनेते प्रसाद सावंत व जलप्राधिकारण अधिकारी वर्ग ( छायाचित्र:-दत्ता शिंदे – माथेरान )

माथेरान (दत्ता शिंदे) मधील पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकटच होत चालली असून बऱ्याच काही त्रुटी असल्या कारणाने माथेरानच्या कार्यशील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जलप्राधिकारण अधिकाऱ्यानं बरोबर चर्चा करण्यात आली.


माथेरान ही पर्यटन नगरी या ठिकाणी दर वर्षा काठी आठ ते दहा लाख येणारे पर्यटक परंतु गेल्या दोन वर्षा पासून कोरोनाच्या महामारीने संपूर्ण पर्यटन हंगाम डबघाईला असून त्याची झळ प्रत्येक लहान मोठ्या व्यवसाय करणाऱ्यांना बसली आहे.माथेरान मधील पाण्याची बिले तर अव्वाच्या सव्वा असून ती बिले भरून सुद्धा माथेरानकरांना अनिमित्त पाणी पूरवठा पर्यटन हंगाम नसताना दर बुधवारी पाणी कपात ह्या मुळे स्थानिकां मध्ये जलप्राधिकाच्या भोंगळ कारभारावर संताप होत आहे.

एक म्हण आहे उशाला धरण घशाला कोरड अशीच काही माथेरानकरांची अवस्था झालो असल्याने त्याची झळ सर्व सामान्यांना सोसावी लागते ती लागतेच तसेच त्या विषयावर ही माथेरानच्या नगराध्यक्षांनी अधिकारी वर्गाला कडक भाषेत समजावून सांगितले.माथेरानचे शरलोट तलावा मध्ये साचलेला गाळ काढण्याबाबत तसेच तो गाळ काढून धूपप्रतिबंध बंधारे बनविण्यात येतील त्याच प्रमाणे तलावा मधून बऱयाच भागातून पाणी लिकेज होत असून त्याची दुरुस्ती करण्यात येईल तसेच पावसाळा संपल्यावर धरणातुन होणारा पाण्याचा विसर्ग त्याचा कशा पद्धतीने उपयोग करता येईल त्या कडे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत तसेच नगरसेवक गटनेते प्रसाद सावंत यांनी अधिकारी वर्गाला सांगितले.

माथेरानकरांना अनियमित पाणीपुरवठा तर नेरळ माथेरान घाटा दरम्यान कनेक्शन असलेल्यांना चोवीस तास पाणी ह्या जोडण्या पूर्णता नियमाच्या बाहेर असून त्या कशा पद्धतीने जोडल्या गेल्यात आणि ह्या जोडण्या अनाधिकृत असून अजून त्या जोडण्या तोडल्या नसून त्या कधी तोडण्यात येतील ह्या विषयावर चर्चा झाली असून त्या जोडण्या कवकरच तोडण्यात येतील असे अधिकारी वर्गा कडून सांगण्यात आले.

त्या नंतर ब्रिटिश कालीन असलेले माथेरान जिवन प्राधिकरण केंद्र यांची पाहणी करण्यात आली त्या वेळेस माथेरानच्या कार्यशील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत गटनेते प्रसाद सावंत, जलप्राधिकारण पनवेलचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत गजभिये,कार्यकारी अभियंता विजय कुमार सूर्यवंशी,कर्जतचे उपअभियंता दीपक देशमुख,यांत्रिकी शाखा अभियंता श्री भोसले,माथेरान अभियंता के.डी.देशमुख,पी.एस .पाटील,दाभने तसेच माथेरान मधील सामाजिक कार्यकर्ते अरविंद शेलार माजी नगरसेवक कुलदीप जाधव उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page