Monday, March 4, 2024
Homeपुणेलोणावळासुळक्यावरून क्लायम्बिंग दरम्यान पडून ट्रॅकर्स चा मृत्यू..

सुळक्यावरून क्लायम्बिंग दरम्यान पडून ट्रॅकर्स चा मृत्यू..

लोणावळा (प्रतिनिधी) : सुळक्यावर क्लांईब करताना एका ट्रेकर्स युवकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तैलबैल येथे घडली .
शिवदुर्गच्या शिलेदारांनी सदर युवकाचा मृतदेह रेस्कू करत बाहेर काढला . सोमनाथ शिंदे ( वय 26 , रा . सध्या कात्रज , मूळ राहणार उस्मानाबाद ) असे मयत झालेल्या ट्रेकर्स चे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ व इतर असा सहा जणांचा ग्रुप तैलबैल येथे ट्रेकिंगसाठी आला होता . रात्री गावात मुक्काम केल्यानंतर आज पहाटे 5.30 वाजता त्यांनी ट्रेकला सुरुवात केली . 6:30 ला climb चालू केला व साधारणतः 9:30 च्या सुमारास lack of proper equipment मुळे फॉल झाला व सोमनाथ शिंदे हा ट्रेकर्स खाली पडला . यामध्ये गंभिर जखमी झाल्याने लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाचे राजेंद्र कडु , महेश मसने , सुनिल गायकवाड,सुरज वरे , योगेश उंबरे , प्रणय अंबुरे , रतन सिंग , आदित्य पिलाने , हर्षल चौधरी , सिद्धेश निसाळ , सिद्धार्थ अढाव व गावातील मदत करणारे कार्यकर्ते अक्षय रोकडे , सुनील वरे , विनोद राऊत , मनीष माडवे , ज्ञानेश्वर मेने यांनी घटनास्थळी धाव घेत रेस्कू करत शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला.
- Advertisment -

You cannot copy content of this page