Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडसुवर्णा दादू कोकळे यांना वकिल पदवी प्रदान..

सुवर्णा दादू कोकळे यांना वकिल पदवी प्रदान..


खोपोली- दत्तात्रय शेडगे धनगर.

समाजातील तरुणी सुवर्णा कुसुम दादू कोकळे यांनी आपले एलएलबी चे शिक्षण पूर्ण करून वकीलिचे पदवी मिळवली आहे, त्यांना नुकताच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे सर्टिफिकेट मिळाले असून वकिली पदाचे पदवी प्राप्त झाली आहे.


धनगर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा गोर गरिबांचे दानशूर नेते समाजसेवक दादू कोकळे यांच्या ह्या कन्या असून त्यांनी आज समाजाचे नाव मोठे केले आहेे.


सुवर्णा कुसुम दादू कोकळे यांनी सन २०१५ -१६ पासून बीएलएस एलएलबीचे शिक्षण चालू केले असून २०२०-२१ साली या पाच वर्ष त्यांनी बीएलएस एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केली आहे.सुवर्णा कोकळे यांचे वडील दादू कोकळे यांचे धनगर समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती असुन समाजात आजही त्यांचा दबदबा आहे.

समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी आणि सुखदुःखात नेहमी अग्रेसर असतात, त्यांच्याच मुलीने आज वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असून आज वकीलिची पदवी मिळवली असून ते सद्य पेन येथील कोर्टात सराव करीत आहेत सुवर्णा कोकळे यांच्या वडिलांचे हे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात सुवर्णाने पूर्ण केले आहे.


रायगड जिल्ह्यात धनगर समाजाच्या तरुणीने वकील पदाचे शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केल्याने धनगर समाजाचे नाव उंचावले असून समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले झाले आहे.

- Advertisment -