if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेच्या वतीने महिला बाल कल्याण अंतर्गत “सुवर्ण कन्या योजना” ही मोहीम राबविणेची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तरी या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा , असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा केतन जोशी व समाज कल्याण सभापती वैशाली दीपक मोरे यांनी केले आहे.
सदर योजना नगराध्यक्षा सौ . सुवर्णा जोशी यांच्या संकल्पनेतून साकार झाली असून त्यांनी ती त्यांच्या वाढदिवशी जाहीर केली होती . या योजनेचा लाभ दि. १ एप्रिल २०२० पासून दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू असेल.
या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामध्ये समावेश असलेल्या महिलांस कन्यारत्न प्राप्त झाल्यास तिच्या पुढील औषधोपचार व सकस – पौष्टीक आहाराकरिता कर्जत नगरपरिषदे तर्फे मातेच्या बँक खात्यामध्ये ५०००/- रु, जमा करण्यात येणार आहेत .
सदर योजनेचा लाभ घेणेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत . १) लाभार्थ्याचा अर्ज, २) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असलेचा पुरावा ३) मुलीचा जन्मदाखला ४)शिधापत्रिका छायांकित प्रत ५) रहिवासी दाखला, ६) आधारलिंक बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत इ. तरी आपल्या प्रभागामध्ये वरील योजनेच्या लाभास पात्र लाभार्थी असलेस त्यांना कर्जत नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा ,असे आवाहन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व सौ. वैशाली मोरे – नगरसेविका तथा सभापती समाजकल्याण समिती यांनी केले आहे .