सूर्यकांत वाघमारे यांचा वाढदिवस उत्सहात साजरा, पवनानगर मध्ये विध्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप…

0
17

पवनानगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर येथे विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . मावळ तालुका आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या वतीने संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . दरम्यान , कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या . मात्र कालपासून राज्यभरासह मावळ तालुक्यातील शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत.

अनेक शाळांमध्ये ढोलताशांच्या गजरात , पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढत व विविध उपक्रम राबवत प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला . त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले .

यावेळी अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,अतुल सोनवणे , उत्तम चव्हाण , संदीप सोनवणे , मोहन सोनवणे , शक्ती जव्हेरी , मंगेश कदम , प्रतीक भालेराव , मुख्याध्यापक राहुल सोनवणे , बाळू कदम , नीता कालेकर , सोनल गांधी , कैलास येवले , मीनाक्षी शिवणेकर , प्रियंका येवले आदी मान्यवर उपस्थित होते .