Wednesday, May 29, 2024
Homeक्राईमसोनाराची फसवणूक करणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना यश...

सोनाराची फसवणूक करणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना यश…

लोणावळ्यातील नामांकित धनलक्ष्मी ज्वेलर्स ज्वेलर्स दुकानाच्या मालकास फसवून १ किलो चांदीची पिंड पॉलिश करून आणतो असे सांगून लंपास करणाऱ्या दुकानातील कारागीर आरोपी रामेश्वर गणेशराव कुलथे ( वय ३६ वर्षे रा.वलवण लोणावळा ता मावळ जि पुणे) यास अटक करण्यास लोणावळा शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाने यश प्राप्त केले आहे. सदरचा आरोपी डिसेंबर २०१९ पासून फरार होता.


सदर आरोपीने डिसेंबर २०१९ मध्ये वरील दुकानातील १ किलो वजनाची चांदीची पिंड पुण्याला जाऊन पॉलिश करून आणतो असे सांगून पसार झाला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुकानातील कारागीर आरोपी रामेश्वर गणेशराव कुलथे यास पोलिसांनी अटक केली आहे.


लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकातील पो. नाईक – वैभव सुरवसे, पो.कॉ.- अजीज मेस्त्री, पो.कॉ.- मनोज मोरे, पो.कॉ.- पवन कराड, पो.कॉ.- राजेंद्र मदने यांनी ही कारवाई केली असून पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे पुढील तपास करत आहेत. 2019 मध्ये लंपास झालेल्या आरोपीस पकडून लॉक डाऊन काळात लोणावळा शहर पोलिसांकडून प्रशंसनीय कामगिरीची आणखी एक मिसाल कायम….

- Advertisment -

You cannot copy content of this page