सोमनाथ हुलावळे यांच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्यानेे त्यांच्या आईचा ही दुर्दैवी मृत्यू

0
2002

कार्ला ( प्रतिनिधी ) दि.11: मुलाच्या मृत्युचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या आई ताराबाई हुलावळे यांचे दुर्दैवी निधन. त्यामुळे संपूर्ण कार्ला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या चर्चेत असलेल्या मायमर हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केलेल्या कार्ला येथील माजी शिवसेना शाखा प्रमुख सोमनाथ हुलावळे यांना कोरोनाची लागण झाली असता ते 1 मे रोजी तळेगाव येथील मायमर मेडिकल कॉलेज मधील कोविड हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत होते.

त्यात दि.9 रविवारी त्यांनी हॉस्पिटलच्या स्टोर रूममध्ये टेलिफोन वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.सोमनाथ यांच्या आत्महत्येने संपूर्ण तालुका हादरला होता. हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडली आहे. यासाठी हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असून मायमर हॉस्पिटल प्रशासनावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मायमर हॉस्पिटलच्या विरोधात मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन ही करण्यात आले होते.

सोमनाथ यांच्या मृत्यूने हुलावळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.सोमनाथ यांच्या मृत्यूची बातमी समजताच धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या मातोश्री यांचे काल दुर्दैवी निधन झाले आहे.मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ह्या बातमीने संपूर्ण मावळात खळबळ उडाली आहे.