Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळसोमाटणे येथे घरफोडी करून 6 तोळे सोन्यासह 1 लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांकडून...

सोमाटणे येथे घरफोडी करून 6 तोळे सोन्यासह 1 लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांकडून लंपास…

मावळ (प्रतिनिधी) : सोमाटणे फाटा येथे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. या घरफोडीत 6 तोळे सोन्यासह 1 लाखाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. ही घटना रविवार दि.11 रोजी रात्री आठ ते सोमवार दि.12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी भारत पांडुरंग जाधव (वय 42, मुळ रा. शेलारवाडी, ता. मावळ, हल्ली रा. येवलेवस्ती, सोमाटणे फाटा, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या दरवाजाला लावलेला कडी कोयंडा तोडून अज्ञात आरोपीने घरात प्रवेश केला आणि घरातील 6 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, तांबेची भांडी व रोख रक्कम असा एकून सुमारे 1 लाख 8 हजार 575 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करुन चोरून नेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे हे करत आहेत.

You cannot copy content of this page