Thursday, September 12, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडसोशिअल मिडीयावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल अपशब्द !

सोशिअल मिडीयावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल अपशब्द !

धार्मिक भावना दुखावणा-या व बोलणाऱ्या नराधामा विरुध्द कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल…

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल आक्षेपार्ह व अपमानकारक मजकुर, पोस्ट लिहून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणा-या व धार्मिक भावना दुखावणा-या इसमाविरुद्ध काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा प्रकार माहीत झालेनंतर कर्जत तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने कर्जत पोलिस स्टेशनला उपस्थित होते . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. सदरची फिर्याद धर्मेंद्र मोरे यांनी फिर्यादी म्हणुन दाखल केली आहे.दोन महिन्या पुर्वी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील घडलेले फेसबुक प्रकरण ताजं असतानाच काल दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी इंस्टाग्राम वर gangster lakhan007 या नावाने असलेल्या अकाऊंटवर आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारा प्रकार घडल्यामुळे बहुजन वर्गात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सायबर सेलचं अपयश चर्चेत आले आहे. अशा पोस्ट व त्यांचे अकाउंटवर सायबर सेल कडुन कारवाई होत नसल्यामुळेच ह्या घटना वाढत आहेत.सायबर सेलच्या अपयशाबद्दल पुन्हा एकदा आंदोलन करणेची तयारी बहुजन वर्गात व जन समाजात होत आहे. सदर गुन्हा दाखल करणेसाठी फिर्यादी धर्मेंद्र मोरे, राहुल डाळींबकर,ऍड कैलास मोरे,सुनिल गायकवाड, कृष्णा जाधव, लोकेश यादव,मनोज गायकवाड, शैलेश खोब्रागडे, सुनील सोनावणे,प्रकाश जाधव, विजय जाधव ,संजय ढोले ,केतन गायकवाड, मोहन जाधव,ललित हिरे,संतोष जाधव, प्रदिप गायकवाड, तसेच इतरही आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page