
पिंपरी दि.३ – पुणे ग्रामीण मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांची नुकतीच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बनायचे पद्माकर घनवट यांच स्वप्न आज साकार झाले.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेमधील एक दिलदार मनाचा अधिकारी म्हणून पुणे ग्रामीण जिल्ह्यात त्यांची ख्याती होती. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा या ठिकाणी काम करत असताना अनेक मोठमोठे दरोडे खून तसेच जबरी चोरीचे गुन्हे त्यांच्या कार्य काळात निकाली लागले आहेत.पुणे ग्रामीण जिल्ह्यात तसेच विविध कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील सर्वसामान्य माणसात मिळून मिसळून राहणारा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे . येणाऱ्या काळात देखील त्यांच्याकडून अशीच समाजोपयोगी कामे होतील अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर गृह विभागाने राज्यातील १७५ निरीक्षकांना एसीपीपदी बढती दिली असल्याने बहुतेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
बढती होण्याच्या प्रतीक्षेत असलेले राज्यातील पावणे दोनशे निरीक्षकांना सरकारने अखेर गोड बातमी दिली. राज्य सरकारने मोठय़ा संख्येने निरीक्षकांना एसीपीपदी बढती दिली. त्यानुसार ९०, ९१, ९२ क ९३ च्या बॅचमधील अधिकाऱ्यांना बढती दिल्याने राज्यात रिक्त असलेली एसीपींची पदे आता भरली जातील. वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले हे अधिकारी एसीपी बनले. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या निरीक्षकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.