Thursday, June 13, 2024
Homeपुणेमावळस्पर्श हॉस्पिटलचे डॉ. बढे यांच्या निषेधार्थ ''आवाज न्यूज '' ला लोणावळा शहर...

स्पर्श हॉस्पिटलचे डॉ. बढे यांच्या निषेधार्थ ”आवाज न्यूज ” ला लोणावळा शहर पत्रकार संघाचा जाहीर पाठिंबा…

लोणावळा : स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे येथील डॉ. राहुल बढे यांनी “आवाज न्यूज “च्या बाबतीत सोशल मीडियावरून केलेल्या नाहक बदनामीचा लोणावळा शहर पत्रकार संघाकडून जाहीर निषेध करत आवाज न्यूजला पाठिंबा देण्यात आला आहे.

स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे येथील डॉ. राहुल बढे यांनी आवाज न्यूजला जाहिरात दिली नाही म्हणून हात धुवून पाठीशी लागले आहेत, ब्लॅकमेल करत आहेत असे काही बिन बुढाचे आरोप सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आवाज न्यूजची बदनामी केली आहे. त्यासंदर्भात आवाज न्यूजच्या वतीने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये डॉ. राहुल बढे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आवाज न्यूजच्या करण्यात आलेल्या नाहक बदनामी संदर्भात तळेगाव लिंब फाटा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषदेत आवाज न्यूजला पाठिंबा देत तळेगाव, मावळ व लोणावळा शहर पत्रकार संघातील पत्रकार उपस्थित होते.दिलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून दखल न घेतल्यास आणि डॉ. बढे यांनी दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन माफी न मागितल्यास आम्ही न्यायालयाकडे मानहानीचा दावा करत दाद मागू असे आवाज न्यूजचे संपादक आकाश भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

डॉ. राहुल बढे यांच्या निषेधार्थ आवाज न्यूजला पाठिंबा देत लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने एम एन न्युज तसेच अष्ट दिशा ई न्यूज मार्फत आवाहन करण्यात येत आहे की ”तुम्ही सामान्यांची लूट करून करोडपती झाले असाल, आम्ही पत्रकार सामान्यांचे आशीर्वाद घेऊन रोडपती जरी असलो तरी आम्हाला आमच्या पेनाच्या ताकतीवर पूर्ण विश्वास आहे ” म्हणूनच डॉ. बढे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा पुढील कारवाईस सज्य रहावे.

- Advertisment -

You cannot copy content of this page