Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळास्पर्श हॉस्पिटल आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार महादेव भवर यांना प्रदान....

स्पर्श हॉस्पिटल आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार महादेव भवर यांना प्रदान….

लोणावळा दि.26: महादेव भवर ( वाकसई, रुग्णवाहिका चालक ) लोणावळा यांना स्पर्श हॉस्पिटल आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान.
72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्श हॉस्पिटल, सोमाटणे आयोजित विशेष कोरोना योद्धा पुरस्कार हा कोरोनाच्या काळात विशेष सहकार्य केलेल्या मान्यवरांना गौरविण्यासाठी आज पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर आयोजित समारंभात लॉक डाऊन मध्ये कोविड रुग्णांना वेळचे वेळी रुग्णालयात दाखल करून आपली प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल वाकसई येथील महादेव भवर ( सुनील अण्णा फौंडेशन प्रणित रुग्णवाहिका चालक ) यास गौरविण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page