Friday, February 23, 2024
Homeपुणेतळेगाव"स्वच्छता ही सेवा श्रमदान" तळेगाव येथील मोहिमेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते...

“स्वच्छता ही सेवा श्रमदान” तळेगाव येथील मोहिमेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शुभारंभ…

तळेगाव (प्रतिनिधी):स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छता ही सेवा श्रमदान ” मोहीम तळेगाव येथे दि.1 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमास CRPF चे DIG गोला सर, माजी उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, रोटरी क्लब मावळ चे सदस्य, वन्यजीव रक्षक मावळ संस्था काव्या करिअर अकादमीचे शिक्षक व विद्यार्थी इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेबाबत शपथ देण्यात आली. मा. मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी सर्वाना स्वच्छतेबाबत संबोधित केले. तळेगाव दाभाड़े शहराचे स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असणारे मंगेश जोशी यांनी विद्यार्थी व नागरिकांना घरगुती कच-याचे कसे विघटन करावे याबाबत मार्गदर्शन केले.
आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी स्वतः स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत व सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली तसेच विद्यार्थी यांनी आमदारांसमवेत “स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, हरित तळेगाव” च्या उद्घोषणा दिल्या.
शहरातील मारोती मंदीर चौक, जीजामाता चौक ते स्टेशन चोक, S. T. स्टैंड चा परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मराठा क्रांती चौक, प्रतिक नगर, यशवंत नगर, हिंदमाता भुयारी मार्ग परिसर, तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन परिसर, गुरुकुल संस्था परिसर इ. ठिकाणी CRPF चे जवान, काव्या करिअर अकादमीचे विद्यार्थी व विद्यार्थीनी, रोटरी क्लब ऑफ मावळ चे सदस्य, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य, महिला दक्षता समितेचे सदस्य, ग्राम सुरक्षा दल सदस्य, वडगाव मावळ वनपरिमंडळ चे कर्मचारी, थोर समाजसेवक नाथूभाऊ भेगडे पाटील शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, नगरपरिषद बचत गटातील महिला तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी आणि नागरीक आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेवून शहरातील नमूद ठिकाणांची स्वच्छता केली.
तसेच मुख्याधिकारी एन.के. पाटील यांनी नागरिकांना स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धन करण्याचे जाहीर आवाहन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page