Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळास्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत "स्वच्छ लोणावळा मॅरेथॉन"चे रविवारी आयोजन…

स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत “स्वच्छ लोणावळा मॅरेथॉन”चे रविवारी आयोजन…

लोणावळा (प्रतिनिधी):स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने खुली मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 6:30 वा. आयोजीत करण्यात आली आहे.या खुला गट मॅरेथॉन मध्ये विध्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी केले आहे.
लोणावळा नगरपरिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा अभियानांतर्गत खुली मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 6.30 वा. आयोजीत करण्यात आलेली आहे.या मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील जवळपास 2000 स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे.सदरची स्पर्धेसाठी चार गट तयार करण्यात आले आहेत. स्पर्धेचा शुभारंभ नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीपासून होणार असून खालील प्रमाणे मार्गस्थ होणार आहे.
1) पहिला गट – विदयार्थी / विदयार्थीनी (5 वी ते 7 वी ) नगरपरिषद प्रशासकीय इमारत – जयचंद चौक ते मावळा पुतळा – कॉन्व्हेंट हायस्कूल, ट्रायोज मॉल – खोंडगेवाडी – सिध्दार्थनगर- पोलीस चौकी नगरपरिषद प्रशासकीय इमारत.
2)दुसरा गट विदयार्थी / विदयार्थीनी (8 वी ते 10 वी ) नगरपरिषद प्रशासकीय इमारत जयचंद – चौक ते मावळा पुतळा – कॉन्व्हेंट हायस्कूल, ट्रायोज मॉल – खोंडगेवाडी सिध्दार्थनगर पोलीस – चौकी – नगरपरिषद प्रशासकीय इमारत.
3) तिसरा गट – महिला (खुला गट) नगरपरिषद प्रशासकीय इमारत पोलीस स्टेशन – वर्धमान सोसायटी – नेव्हल क्वार्टरर्स सहारा ब्रीज – मराठे पेट्रोल पंप पासून परत आहे त्याच – मार्गाने नगरपरिषद प्रशासकीय इमारती पर्यंत.
व 4) चवथा गट – पुरुष (खुला गट) नगरपरिषद प्रशासकीय इमारत पोलीस स्टेशन – वर्धमान – सोसायटी – नेव्हल क्वार्टरर्स – सहारा ब्रीज – मराठे पेट्रोल पंप ते भुशी गाव ते रामनगर मल्हार – हॉटेल पासून परत आहे त्याच मार्गाने नगरपरिषद प्रशासकीय इमारती पर्यंत असा मार्ग असणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना लोणावळा नगरपरिषदे कडून टी शर्ट व टोपी देण्यात येणार आहे. तसेच चार गटांमधील प्रत्येकी तीन क्रमांकासाठी पारितोषिक ही देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दिली तसेच सदरची मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्याकरिता नागरिकांनी जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.आपण या स्पर्धेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी व्हावे अशी विनंती आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page