स्वतःच्या मुलीचे धड शरीरावेगळे करणाऱ्या बापाला पोलिसाच्या बेड्या..

0
266

खोपोली- दत्तात्रय शेडगे

स्वतःच्या मुलीचे मुंडकं छाटून फरार झालेल्या पित्याला खोपोली पोलीसांनी बिहारमध्ये जावून बेड्या ठोकल्या आहेत. खोपोलीत या निर्दयी बापाने हत्या केली होती. अजय सुदर्शन सिंह असे त्याचे नाव आहे.

अजय सुदर्शन सिंह हा त्याची पत्नी आणि दोन मुलीसह चार दिवसापूर्वी खोपोली शहरातील एका लॉजवर राहत होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजता अजयने पत्नीला मुलाचा भूत उतरविण्याच्या बहाणा सांगत मुलींना खालापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाळ गावानजीक म्हाडा कॉलनीच्या मागे घेवून गेला. यादरम्यान त्यांनी 14 वर्षीय खुशीला चाकूने भोसकून तिचे शीर धडावेगळे करून पाताळगंगा नदीत फेकून घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेने हादरुन गेलेली खुशीच्या आईने दुसर्‍या मुलीसह घटनास्थळावरून पळ काढत खोपोली पोलीस स्टेशन गाठले. दुसरीकडे हत्या करून अजयने मुळगाव बिहारकडे जात असल्याचा ट्रेस खोपोली पोलिसांना लागला. त्यामुळे पोलीसांचे एक पथक विमानाने बिहारला पोहचले. तेथील स्थानि रेल्वे पोलीसांच्या मददतीने रेल्वस्थानकावरच अजयला ताब्यात घेतले. अवघ्या 24 तासात खोपोली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

खालापूर पोलिस उपविभाग पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलिस निरिक्षक धनाजी क्षिरसागर, खालापूर पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरिक्षक अमोल वळसंग, पोलिस अंमलदार प्रदीप खरात, प्रविण भालेराव यांनी ही कौतुकास्पद कारवाई केली.