Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडस्वर्गीय मित्राच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अश्वपालांचा पुढाकार...

स्वर्गीय मित्राच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अश्वपालांचा पुढाकार…

माथेरान- दत्ता शिंदे

माथेरान मध्ये काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते तथा अश्वपाल संघटनेचे सर्वेसर्वा स्वर्गीय हेमंत बिरामणे यांचे कोरोना मुळे मुंबई मधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले होते.सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच पुढे असणारे आणि अश्वपालकांना काही अडचणी निर्माण झाल्या अथवा काहीही समस्या उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी हेमंत बिरामणे त्या साठी सदैव तत्पर असत.
सर्वाना सोबत घेऊन जाणारा हा एक लढवय्या अचानक आपल्यातून निघून गेल्यामुळे कधीही भरून न येणारी जी पोकळी संघटनेत निर्माण झाली आहे.महात्मा गांधी मार्गावर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हेमंत हे वेळोवेळी व्यावसायिक दृष्टीने चर्चासत्र करीत असत.
त्यांच्या पश्चात त्यांची आठवण सदैव सोबत असावी यासाठी अश्वपाल उमेश ढेबे, पांडू गोरे, विजय आखाडे, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी मुख्य रस्त्या लगत स्वर्गीय हेमंतभाई मित्र परिवार नामक फलक उभारला आहे त्यावर माथेरानचा नकाशा आणि काही अशवपालकांकडून पर्यटकांची नेहमीच फसवणूक होऊन पर्यटकांकडुन अवाजवी रक्कम उकळली जाते याला आळा घालण्यासाठी सर्व बाजूचे पर्यटनाबाबतीत अश्व भाडे(दर ) लावण्यात आले आहेत त्यामुळे या फलकाच्या माध्यमातून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणुकीला ब्रेक लागणार आहे.
या फलकाचे अनावरण शिवसेनेचे शहर प्रमुखचंद्रकांत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यसम्राट उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, प्रकाश सुतार, भाजपचे अध्यक्ष विलास पाटील, वसंत कदम, बाबूं बर्गे यांसह अश्वपाल मोठया संख्येने उपस्थित होते. हेमंत बिरामणे यांच्या कार्याबद्दल अनेकांनी आपले विचार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page