स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला गुंडगे प्रभागातील अनेकांचा मनसेत प्रवेश !

0
48

तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले जितेंद्रदादा पाटील यांच्या कार्याकडे आकर्षित..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले लोकप्रिय रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शहर अध्यक्ष समीर चव्हाण व शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर यांच्या प्रयत्नाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सन्माननीय जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.


कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इंजिन सध्या जोशाने दौडत आहे.यापूर्वी देखील येथे शाखा असून कर्जत शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर यांचे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न नेहमीच असल्याने व वरिष्ठ मनसे पदाधिकारी यांच्या सहकार्यामुळे गुंडगे प्रभागातील समस्या त्यांच्या प्रयत्नाने मार्गी लागल्या असल्याने त्यांच्या कार्यावर प्रभावीत होऊन आज गुंडगे प्रभागातील अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला.


यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर , शहराध्यक्ष समीर चव्हाण , कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक हेमंत ठाणगे , सचिव चिन्मय बडेकर , शहर उपाध्यक्ष ओमकार मोरे , शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर व इतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गुंडगे प्रभागातील चेतन जंगम,किशन कासुडे,रोहन मोरे,शुभम सोनावणे, गौरव दळवी, आशीष मोरे,वैभव मुने,आकाश जाधव,चंदू जंगम,निलेश कदम,शुभम नवले,ओम दळवी आदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

त्यांच्या पक्ष प्रवेशाने आगामी काळात मनसेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे , तर सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या पाठीशी पक्ष ठाम उभा असेल , असे आश्वासन जिल्हाध्यक्ष जितेंद्रदादा पाटील यांनी यावेळी दिले.