Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडस्वातंत्र्य दिनी " देशासाठी व समाजासाठी " विशेष योगदान देणाऱ्या विभूतींचा खोपोलीत...

स्वातंत्र्य दिनी ” देशासाठी व समाजासाठी ” विशेष योगदान देणाऱ्या विभूतींचा खोपोलीत भव्य दिव्य सन्मान सोहळा संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) देशासाठी आपले आयुष्य वेचणारे स्वातंत्र्य सैनिक , देशाची भावी पिढी घडविणारे गुरुसमान शिक्षक व समाजातील अंधश्रध्दा , व्यसनमुक्ती , जातीयतेची भिंत याचे समूळ नष्ट करण्यासाठी जनजागृती करणारे कीर्तनकार , तर गायनाच्या माध्यमातून महापुरुषांची थोरवी जनतेत पेरणारे गायक , तर अनेक सामाजिक , धार्मिक , सांस्कृतिक उपक्रम करून समाजात एकोपा जागृत ठेवणाऱ्या सामाजिक संस्था यांचा सत्कार ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत ” यांच्या संकल्पनेतून कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघ आयोजित खालापूर तालुका मर्यादित असा भव्य दिव्य सन्मान सोहळा ” खोपोली येथे १५ ऑगस्ट २०२४ या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केला होता .
या ” आगळ्या वेगळ्या ” कार्यक्रमानिमित्ताने अनेकांना शाल , पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह व तुळशीचे रोप देवून शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाचे विधानसभा संपर्क प्रमुख , खोपोली शहर प्रमुख तथा मा. नगराध्यक्ष सुनील पाटील , पत्रकार भाई जगन्नाथ ओव्हाळ , पत्रकार प्रशांत गोपाळे , महिला संघटिका पाटील , शहर संघटक दिलीप पुरी , पत्रकार व शिवसेनेचे पदाधिकारी रविंद्र मोरे या सर्वांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी १९७१ साली झालेल्या युद्धात भाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक माळी यांना एक पाय गमवावा लागला होता , ते म्हणाले की आजच्या दिवशी आमचा सन्मान म्हणजे खूप मोठा ” सुवर्ण योग ” असून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचे व पदाधिकारी यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

यावेळी महिला भगिनिंसाठी आयोजित लकी ड्रॉ स्पर्धेत पहिले विजेत्या नंदा दिलीप धडाम – रू. ७७७७ , द्वितीय क्रमांक शैला भगत – रू. ६६६६ , तृतीय क्रमांक वंदना श्रीकांत उपाध्ये मॅडम – रू. ५५५५ , चतुर्थ क्रमांक प्राजक्ता किशोर बैलमारे – सावरोली – रू. ४४४४ तर पाचवा क्रमांक प्रीती नरेश घरत यांचा लागला असता त्या उपस्थित नसल्याने पुन्हा लकी ड्रॉ कूपन काढल्यावर शालन जगनाथ मोहिते – रू. ३३३३ / – सुभाष नगर या विजेत्या ठरल्या . त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले . तसेच ” शिल्पकार साहित्य कला मंडळाने ” समाजात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिल्पकार साहित्य कला मंडळाचे रायगड जिल्हा अध्यक्ष गायक नरेश जाधव , माजी अध्यक्ष अशोक सोनावळे, जेष्ठ सल्लागार जगन्नाथ दादा ओव्हाळ या सर्वांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

या सन्मान सोहळ्या दरम्यान ” मराठी गीतांचा म्युजिकल ऑर्केस्टा आणि देशभक्तीपर गीते नृत्य आविष्कार ” कार्यक्रम सादर करण्यात आला . श्रीराम मंगल कार्यालय, बाजारपेठ खोपोली येथे या भव्य दिव्य सन्मान सोहळ्यास खोपोली व खालापूर तालुक्यातील अनेक किर्तनकार , शिक्षक वर्ग , सामाजिक संस्थेचे पदाधिकारी , खोपोलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page