Thursday, September 28, 2023
Homeपुणेमावळस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न....

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न….

मावळ : स्वाभीमानी रिपब्लिकन पक्षाची आढावा बैठक पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नितीन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत येथे संपन्न झाली.वेळी आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, देहूरोड शहर , लोणावळा शहर सर्व अधिकारी ,पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मावळ तालुक्याच्या वतीने केंद्रीय सदस्य युवा अध्यक्ष नितीन साळवे, तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, पु.जि. प्रवक्ते अन्न पुरवठा समिती सदस्य कोंडीबा रोकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, सरपंच रुपेश(बंटीभाऊ) गायकवाड, देहूरोड शहर अध्यक्ष जावेदभाई शेख,कार्याध्यक्ष बबनराव जाधव सह उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.


सदर आढावा बैठकीचे प्रास्थाविक बबनराव ओव्हाळ यांनी केले. तर प्रवक्ते कोंडीबा रोकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, रुपेश गायकवाड, शिवाजी ओव्हाळ, रवी भवार, जावेद शेख, संदीप ओव्हाळ, विजय भवार, विजय साबळे इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.


आगामी काळात पक्षाची जडण घडण कशी असावी त्यासंदर्भातील अनेक विषयांवर चर्चा करताना नितीन साळवे यांनी येणाऱ्या काळात भागाचे दौरे करणे , पक्ष संघटन वाढवणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन रवी भवार यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप ओव्हाळ यांनी केले.

- Advertisment -