Wednesday, October 16, 2024
Homeपुणेमावळस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्त्यांची ” घर वापसी “…

सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणार अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांचे आश्वासन !

मावळ प्रतिनिधी. गोर गरीब – पिडीत – कष्टकरी – वंचित – बहुजन वर्गास तसेच इतर नागरिकांना न्याय देण्यास व समस्या सोडविण्यात अग्रेसर असलेल्या ” स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. रमेश भाऊ साळवे ” यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत इतर पक्षात गेलेल्या अनेकांचा ” घर वापसी ” होत आज झालेल्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ मतदार संघाच्या बैठकीत पक्ष प्रवेश झाला . राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीचे नियोजन मावळ तालुका अध्यक्ष बबनभाऊ ओव्हाळ यांनी केले होते.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांना पक्षात मान सन्मान व न्याय दिला जाईल , असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांनी याप्रसंगी दिले .गेली अनेक वर्षे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष बहुजनांचे व वंचितांचे प्रश्न – समस्या शासकीय स्तरावर सोडवीत आहे . राजकीय पटलावर देखील आपल्या कार्यकर्त्यांसाठी ” सत्तेचा हिस्सा ” मागून ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद तसेच शेतकरी संघटना , साखर कारखाने , खरेदी विक्री संघावर पक्षाचे अनेक कार्यकर्ते निवडून जात आहेत . एस आर पी पक्ष व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे हे जो ठरवतील तोच ” आमदार व खासदार ” होत असल्याने दक्षिण महाराष्ट्रात पक्षाचे चांगलेच बस्तान बांधले असून पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत . पूर्वीच्या पँथर ला साजेशी ” टायगर मुव्हमेंट ” असलेला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तरुणांच्या मनात घर करून आहे . त्यामुळे अध्यक्ष रमेश भाऊ साळवे हे अनेक तरुण वर्गातील गळ्यातील ताईत आहेत.

मावळ तालुका अध्यक्ष बबन भाऊ ओव्हाळ यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड तसेच मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते यांनी आज ” घर वापसी ” केली आहे . ज्या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला , त्या वेळेस जे दुरावलेले कार्यकर्ते होते ते पुन्हा आपले ” रक्षणकर्ते राष्ट्रीय अध्यक्ष सर्वसामान्यांचे रमेश भाऊ साळवे साहेब ” यांच्या घरट्यात परत आले असून त्यांचे स्वागत व हार्दिक अभिनंदन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे साहेब , संत तुकाराम साखर कारखाना संचालक सखाराम शेठ गायकवाड , जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता शेठ यादव , जिल्हा अन्न पुरवठा सदस्य कोंडीबा मामा रोकडे , तालुका अध्यक्ष बबन राव ओव्हाळ , भारतीय बौध्द महासभा मावळ प्रमुख रवी नाना भवार , कामशेत शहराचे विद्यमान सरपंच बंटी शेठ गायकवाड , आदी पक्षाचे पदाधिकारी या पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

यावेळी पक्षाचे जुने आधारस्तंभ अंकुश भाऊ चव्हाण , किशोर भाऊ वंजारी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ” घर वापसी ” करत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page