Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा सुधाकर भाऊ घारे यांना बिनशर्त पाठिंबा…

” स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा सुधाकर भाऊ घारे यांना बिनशर्त पाठिंबा…

या मतदार संघातून ” १५ हजारांचा ” लीड देणार – जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या काळात कर्जत – खालापूर नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात विकास कार्य करणारे तसेच कोरोना काळात गोर गरीब जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता मदत करायला बाहेर पडून अनेकांना पोटाला अन्न , औषध , पाणी , तर मदतीचा हात पुढे करणारे सुधाकर भाऊ घारे यांचे कार्य महान असल्यानेच आम्ही देखील पुरोगामी बहुजन विचार सरणीचे असल्यानेच आमची व त्यांची नाळ जुळली असून या कर्जत मतदार संघात निवडणुकीस सामोरे जाणारे परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना या निवडणुकीत एस आर पी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रमेश भाऊ साळवे साहेब यांच्या आदेशा नुसार या मतदार संघात बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव यांनी व्यक्त केले . सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर २०१४ रोजी परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . याप्रसंगी त्यांनी पक्षाचा पाठींबा असलेले पत्र उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना दिले.

यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , कर्जत तालुका अध्यक्ष प्रभाकर दादा गोतारणे , सचिव प्रकाश जाधव , युवा अध्यक्ष संजीव ढोले , चंद्रकांत धनवटे , शहर अध्यक्ष सुभाष सोनावणे , शहर महासचिव भालचंद्र गायकवाड , संघटक बबन कदम , अनिल जाधव , राहुल कांबळे , कुणाल जाधव , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव म्हणाले की , मी ३५ वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे , या दोन्ही तालुक्यात एस आर पी पक्षाचे कार्यकर्ते तसेच माझा समाज , नाते संबंधी मोठ्या संख्येने असून आम्ही जोरदार प्रचार करून सुधाकर भाऊ घारे यांना १५ हजारांचे मताधिक्य देवू , अशी ग्वाही दिली.

यावेळी परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव व सर्व पदाधिकारी , कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत , तुमच्या सर्व समस्या व अडी अडचणीत मी आपल्या पाठीशी खंबीरपणें उभा राहीन , असे आश्वासन दिले .
- Advertisment -

You cannot copy content of this page