Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळास्व. अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला दादा...

स्व. अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा प्रथम मानकरी ठरला दादा ढमाले स्पोर्ट फौंडेशन(भाजे) संघ…

लोणावळा (प्रतिनिधी): स्व. अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ साईनाथ मित्र मंडळ व आय डी क्रिकेट क्लब आगवाला चाळ आयोजित भव्य फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धा दि.8 डिसेंबर ते दि.12 डिसेंबर या कालावधीत रेल्वे ग्राउंड लोणावळा येथे संपन्न झाली.
साईनाथ मित्र मंडळ व आय डी क्रिकेट क्लबने प्रथमच ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत मावळातील तब्बल 16 नामवंत संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. सलग पाच दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सांगता काल दि.12 रोजी झाली. स्व. अशोक चौधरी यांच्या स्मरणार्थ फुल पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्याच्या लढतीत दादा ढमाले स्पोर्ट फौंडेशन (भाजे) विरुद्ध तुंगार्ली क्रिकेट क्लब (लोणावळा) असा अंतिम सामना खेळविण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना दादा ढमाले स्पोर्ट फौंडेशन संघाने 8 षटकात तब्बल 112 धावांचे आवाहन तुंगार्ली क्रिकेट क्लब संघा समोर ठेवले असता तुंगार्ली संघाकडून 8 षटकात केवळ 80 धावा जोडण्यात आल्याने दादा ढमाले स्पोर्ट फौंडेशन या संघाने 32 धावांनी विजय मिळवत या स्पर्धेच्या प्रथम क्रमांक व सन्मान चिन्हाचा मानकरी ठरला दादा ढमाले स्पोर्ट फौंडेशन(भाजे ) तर द्वितीय क्रमांकावर तुंगार्ली क्रिकेट क्लबने बाजी मारली, तृतीय क्रमांकावर बाळाभाऊ सकट रेल्वे बॉइज हा संघ तर चतुर्थ क्रमांकावर रामनगर क्रिकेट क्लब या संघाने बाजी मारली.
सलग पाच दिवस सुरु असणाऱ्या साईनाथ मित्र मंडळ व आय डी क्रिकेट क्लब आगवाला चाळ आयोजित स्व. अशोक चौधरी क्रिकेट स्पर्धेचा मालिका विर हे पारितोषिक मुन्ना पिंपळे याने पटकावत सायकल बक्षीस मिळविले, उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक दत्ता पवार तर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक शनी याने पटकाविले आहे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मोठया उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली तसेच यावेळी क्रिकेट प्रेमी व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा मोठया प्रमाणात आनंद घेतला.
या स्पर्धेचे आयोजक गोविंद चव्हाण, मेलरॉय डिसोझा, इरफान शेख, कुणाल अन्सारे, आकाश अन्सारे, फ्रांसिस डिसोझा व नितीन मराठे यांनी योग्य व उत्कृष्ठ नियोजन केले आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.
या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी माजी नगरसेवक नारायण पाळेकर, दीप राज चौधरी, उषाताई चौधरी,जय चौधरी,देविदास कडू,परेश बडेकर,आतिश साळवे,अनिल वाघमारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर माजी नगरसेवक देविदास कडू यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page