Monday, July 15, 2024
Homeपुणेलोणावळास्व. आनंदभाऊ शिंगाडे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान.... आदिवासी व गरजूंना केले...

स्व. आनंदभाऊ शिंगाडे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान…. आदिवासी व गरजूंना केले अन्न वाटप..

( खोपोली प्रतिनिधी:दत्तात्रय शेडगे )
लोणावळा : दि. 13, धनगर समाजाचे नेते व आपटी ग्रामपंचायतचे सदस्य स्व. आनंदभाऊ शिंगाडे यांच्या पाचव्या पुण्यतीथी निमित्ताने भुशी रामनगर आय. एन. एस. शिवाजी येथील आदिवासी कुटूंबाना व हातावर पोट असलेल्या कामगारांना अन्न वाटप करण्यात आले.स्व. आनंद शिंगाडे हे धनगर समाजातील होतकरू व धडाडीचे नेते होते.
मनमिळाऊ स्वभाव व प्रामाणिकपणा असलेल्या व्यक्तिमत्वाच्या स्मृतीस आदरांजली म्हणून स्व. आनंदभाऊ शिंगाडे प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला यावेळीं लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक माणिक मराठे, नगरसेविका कल्पनाताई आखाडे, भाजपा लोणावळा शहर उपाध्यक्ष मोहन राव, सुनिल बेंगले, रतन मराठे, स्व आनंदभाऊ शिंगाडे प्रतिष्ठानचे संस्थापक भीमा शिंगाडे, अध्यक्ष दिनेश कोकरे, उपाध्यक्ष रोहित आखाडे, सल्लागार हेदेे सर, संतोष मरगले, अनंता मरगले, दत्ता आखाडे, संतोष शेडगे, यश आखाडे, विकास आखाडे, भागू कोकरे, नितीन झोरे, नजीर शेख, शिवा आखाडे, सुशांत राणे, , ग्रामपंचायत सदस्य राजू हिरवे, चेतन चव्हाण, अमोल आव्हाड, शंकर पंत, आकाश तलवार, निकी जिनवाल, , अनु गायकवाड, सोनू रहिसपाल, आकाश मोरे आदी उपस्थित होते मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page