![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
पवना (प्रतिनिधी):हिंदूह्रदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना पवनानगर च्या वतीने आज गुरुवार दि.17 नोव्हेंबर रोजी साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
तसेच साहेबांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय काले कॉलनी व जिल्हा परिषद शाळेत वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांकडून जिल्हापरिषद शाळेमधील लहनग्या मुलांना स्व.बाळासाहेबांबद्दल माहीती दिली व वृक्षारोपण आणि त्याचे फायदे सांगण्यात आले. त्यावेळी लहानग्या मुलांमधे माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बद्दल ची माहीती व कुतुहल असल्याचे जाणवले.
यावेळी तालुका उपप्रमुख अमित कुंभार,विकास कालेकर,पवनानगर शाखाप्रमुख किशोर शिर्के,युवासैनिक प्रविण वैष्णव,विक्की जेव्हेरी,शिवाजी पवार,निवृत्ती कालेकर,दत्ता बहीरट,विजय भालेराव,रूपनवरसर, तांबोळी मॅडम,जव्हेरी मॅडम व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेच जिल्हा रूग्णालयातील गिरिजा पाद्धे,संदिप कुलकर्णी,विजया नलावडे,दिपा खंटाळे,उत्तम ठाकर यांसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.