स्व. मगनबाई व्यास यांना दौंडचे ह भ प प्रशांत महाराज भागवत यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली…

0
114

लोणावळा शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक ए – 1 चिक्कीचे मालक रमेशसिंह देविशंकर व्यास यांच्या मातोश्री स्व. मगनबाई देविशंकर व्यास यांचे 99 व्या वर्षी निधन झाले. मातोश्री गगनबाई यांच्या परिवाराला भेट देऊन दौंड येथील ह भ प प्रशांत महाराज भागवत यांच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. अगदी प्रेमळ, मायाळू, परोपकारी,रामभक्त अशी यांची किमया असणारी माऊली म्हणजे मगनबाई. यांच्या जीवनाचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे.

अशा ह्या पुण्यवान मातेला ह भ प प्रशांत महाराज यांच्या शब्दातून काव्य रचना करून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच त्यांचे नवीन काव्य पुस्तक ” नावातच सारं काही” या नामांकित काव्य संग्रहात हे काव्य प्रसिद्ध केले आहे. या काव्याची एक प्रत रमेशसिंह व्यास यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली आहे.

मानवी जन्माचे सार्थक करून दाखविणारी मूर्ती म्हणजे माई मगनबाईंची कीर्ती . मगनबाई यांनी जी संस्कारसंपन्न पिढी तयार केली आहे त्याचे उदाहरण म्हणजे त्यांचे सुपुत्र रमेशसिंह व्यास यांनी A – 1 चिक्की ह्या व्यवसायातून प्रसिद्धी तर मिळविलीच आहे तसेच शहरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपली एक छाप निर्माण केली आहे.शहरातील अनेक गरजूंना मदतीचा हात देत पूर्व विचारातून मातोश्रींच्या श्रद्धांजली कार्यक्रमात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच सामाजिक संस्थांना 47 लाखांची देणगी रमेशसिंह व्यास यांच्यावतीने देण्यात आली. तसेच त्यावेळी कोरोना काळात सेवा देणाऱ्या मधुरा पुराणिक यांना सन्मानित करण्यात आले.