हजरत कासिम शहा वली उर्स शरीफ मध्ये हजारो भाविकांचा सहभाग…

0
276

लोणावळा :हजरत कासिम शाह वली दरगाह येथे सालाबादप्रमाणे उर्स शरीफचे आयोजन सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

मागील दोन वर्ष कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी मागील दोन वर्ष आजच्या तारखेला फक्त ट्रस्टिंच्या मोजक्या उपस्थितीत दरग्यामध्ये हा धार्मिक कार्यक्रम सुन्नी मुस्लिम जमात कडून करण्यात आला.
यंदा मात्र कसलीही बंधने नसल्यामुळे सुन्नी मुस्लिम जमात च्या वतीने” हजरत कासिम शहा वली ” यांच्या उर्स शरीफ मध्ये कोणतीही कमतरता न करता आयोजन करण्यात आले आहे.

लोणावळा शहरात जात – धर्म,पक्ष असा कोणताही भेदभाव न बाळगता उर्स शरीफचा उत्सव मोठया उत्सहात संपन्न झाला यावेळी लोणावळा परिसरातील सर्व नागरिक व भाविकांनी हजरत कासिम शाह वली दरग्यात दर्शन घेवून प्रचंड गर्दीने या उत्सवाचा आनंद घेतला.दरग्या बाहेर विविध खेळणी, विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने लावण्यात आली होती. आलेल्या भाविकांसाठी कमिटीच्या व सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने न्याज ( भांडारा ) चे मोठया प्रमाणात आयोजन करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था चोख करण्यात आली होती.यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला.

सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टचे चेअरमन शफी अत्तार, वाईस चेअरमन रफिक हुसेन शेख, ट्रस्टी हाजी इसहाक हाजी मोहीद्दीन पटेल, ट्रस्टी हाजी नुरअहेमद अब्दुल्ला काठेवाडी, सेक्रेटरी सलीम हुसेन खान यांच्या मार्गदर्शनाखाली उर्स कमिटीचे अध्यक्ष अक्रम जमालुद्दीन पठाण, उपाध्यक्ष ताजुद्दीन गुलाब शेख, खजिनदार शफी अत्तार, उपखजिनदार रफीक हुसेन शेख, सेक्रेटरी अल्लाहबक्ष माहमूद शेख, वाईस सेक्रेटरी फिरोज नजीर शेख, अल्तमश तांबोली इत्यादी उर्स कमिटीचे सदस्य असून उद्योजक हनिफ हसन शेख, झिशान हनिफ शेख व फरहान हनिफ शेख हे कमिटीच्या सल्लागार स्थानी होते.

उर्स शरीफ निमित्त दि.21 रोजी संदल शरीफ ( मिरवणूक ) भव्य मिरवणूक तर दि.22 रोजी रात्री 10 वा. करमणूकीच्या कार्यक्रमात कव्वाल सरफराज चिश्ती व हाबीब अजमेरी यांच्या कव्वालीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टी हाजी पटेल यांनी दिली आहे.तसेच सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कव्वालिचा आनंद घ्यावा असेही ते म्हणाले.