हथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा आरपीआय ( A ) मावळ तालुकाच्या वतीने वडगाव येथे जाहीर निषेध…..

0
132
मावळ : उत्तर प्रदेश येथील हथरस जि. चंद्रप्पा परिसरातील एका गावामधील दलित 19 वर्षीय पीडित कु. मनीषा वाल्मिकी हिच्यावर चार नराधमांनी केलेला सामूहिक बलात्कार तसेच बलरामपूर येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशातून जाहीर निषेध करण्यात येत आहे. हथसर येथील पीडितेला न्याय मिळणार का ? कधी थांबणार देशातील महिलांवरील अत्याचार ? यासंदर्भात आरपीआय ( A ) मावळ तालुकाच्या वतीने निषेध करण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली हथरस घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) मावळ तालुकाच्या वतीने मावळ तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वडगाव मावळ यांना निवेदन देण्यात आले. हथरस येथील दलित मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापली व तिच्या मणक्याची हाडे मोडण्यात आली. पोलीस प्रशासनाने तीचे शव तिच्या घरच्यांना अंत्यविधीसाठी न देता रात्रीच्या काळोखात परस्पर तिचा अंत्यविधी करून पुरावे नष्ट केले तसेच मीडियाद्वारे तिच्या घरच्यांनी आपली व्यथा व्यक्त करू नये म्हणून मीडियाला देखील जबरदस्तीने पीडितेच्या घरच्यांना भेटण्यापासून अडविण्यात आले.
ह्या कृत्याचा निषेध करत संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ताबडतोब निलंबित करून घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. कारवाईला विलंब लागल्यास आरपीआय ( A ) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला.कोविड 19 चे नियम लक्षात घेऊन हे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी आरपीआय ( A ) चे मावळ तालुका अध्यक्ष दत्ता यादव, पुणे जि. युवा अध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ता. उपाध्यक्ष सुनील सोनवणे, युवा ता. अध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ, संजय गायकवाड युवा उपाध्यक्ष मावळ, दिलीप सुतार, निलेश गायकवाड, स्वप्नील भालेराव, राहुल वंजारी, दिनेश शिंदे, किशोर वंजारी, जुगदार अमीन, मोहिते, वि. चव्हाण इत्यादी मावळ, पवन मावळ, नाने मावळ, कामशेत शहर, वडगाव शहरचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.