Thursday, July 3, 2025
Homeपुणेलोणावळाहर घर तिरंगा अंतर्गत लोणावळा शहरातील मंदिर मस्जिद दर्गा व चर्च वर...

हर घर तिरंगा अंतर्गत लोणावळा शहरातील मंदिर मस्जिद दर्गा व चर्च वर फडकतोय तिरंगा…

लोणावळा : आजादी चा अमृत महोत्सव साजरा करत असताना हर घर तिरंगा या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्वधर्म समभाव जपणाऱ्या लोणावळा शहरातील मस्जिद, दर्गा, चर्च, मंदिरे, शाळा, विद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा लावून आजादी चा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व धार्मियांनी बलिदान दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत याच अनुषंगाने केंद्र शासनाने हर घर तिरंगा या मोहीमे अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व ठिकाणी तिरंगा लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार लोणावळा शहरातील घरांवर, आस्थापना , शासकीय , निमशासकीय कार्यालये , शाळा , मंदिर मस्जिद , दर्गा , चर्च या सर्व ठिकाणी तिरंगा झेंडा फडकविण्यात आला आहे.

हा आझादी चा अमृतमहोत्सव साजरा होत असताना देशातील प्रत्येक जण तिरंगा राष्ट्रध्वज लावत आहे . लोणावळा शहरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदानं राहतात. सर्वधर्मीयांचे सण सर्वजण एकत्र येऊ साजरे करतात . शहरात कधी जातीयवादी तेढ निर्माण होऊ न देता प्रेम भावनेतून जातीय सलोखा येथे राखला जातो.

गणपती , मोहरम , दहीहंडी , ईद , नाताळ , दिवाळी , दसरा यासारखे सण एकत्रित साजरे करतात . आज सकाळी शहरातील सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांवर राष्ट्रध्वज फडकावत देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या . मागील दोन दिवसांपासून आझादी का अमृतमहोत्सव याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून, शाळांमधून जनजागृती केली जात आहे.

तसेच यावेळी लोणावळा नगरपरिषदेने विविध स्पर्धाचे आयोजन केले असून 15 ऑगस्ट रोजी शहरातील शाळांमधून प्रभातफेरी काढत लोणावळा नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसमोर येणार आहेत त्याठिकाणी ध्वजारोहन करून विध्यार्थी, शहर पोलीस व आयएनएसचे कॅडेट्स तिरंगा झेंड्याला सलामी देत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page