हळदी कुंकूच्या कार्यक्रमाने रायवूड येथील श्री गणेश जयंती उत्सहात संपन्न…

0
88

लोणावळा : – रायवूड मित्र मंडळ श्री गणेश जयंती उत्सव यावर्षीही मोठ्या आनंदानं उत्साहाने पार पडला.

श्री गणेश जयंतीचे औचित्य साधत धनंजय काळोखे यांनी खास महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले . यावेळी दूरदर्शन सह्याद्री वरील सूत्रसंचालिका पूजा सुनील थिगळे यांच्या सुंदर आणि मधुर सादरीकरणातून स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा मनोरंजनात्मक प्रबोधनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात रायवूड , जुना खंडाळा , भुशी,रामनगर , हनुमान टेकडी व परिसरातील जवळपास 1500 हून अधिक महिलांनी आपला सहभाग नोंदवला . कोरोना संदर्भातील सर्व काळजी घेऊन हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला . सदर कार्यक्रमासाठी आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सौभग्यवती सारिका सुनिल अण्णा शेळके यांची उपस्थिती लाभली . त्यांनी हा बहारदार कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धनंजय काळोखे यांचे कौतुक करून ‘ चूल आणि मूल सांभाळणारी महिला प्रत्यक्ष घराबाहेर येऊन स्वतःसाठी वेळ काढते आणि बक्षीस जिंकण्याचा व खेळण्याचा आनंद लुटते ही एका सामान्य महिलेच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे असे बोलून काळोखे यांचे आभार मानले.

यावेळी पार पडलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी व फ्रिज सौ . धनश्री जाधव जुनाखंडाळा यांनी तर द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही सौ . तुळस सावंत , वॉशिंग मशीन सौ रेश्मा पडवळ , मिक्सर सौ . मागरेट आणि इलेक्ट्रॉनिक शेगडी सौ . लता जोशी यांनी जिंकली.

यावेळी सूत्रसंचालिका पूजा सुनील थिगळे यांच्या संकल्पनेतून ज्या महिलांनी आपला संसार मुलींवर मोठा केला आहे अशा आदर्श मातांचा सन्मान धनंजय काळोखे यांच्या शुभहस्ते करण्यात आला . या कार्यक्रमासाठी नगरसेविका आरोहि तळेगावकर , नगरसेविका अंजनाताई बाळासाहेब कडू , राष्ट्रवादी महिला अध्यक्षा मंजुश्री वाघ मंडळाचे विश्वस्त विलासभाऊ बडेकर व रायवुड गणेश मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते . प्रास्ताविक ह भ प श्री दीपक नाना हुंडारे यांनी केले तर आयोजक धनंजय काळोखे यांनी आभार मानले.