if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
पिंपरी दि. ८ – बहुजन सम्राट सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत असून बहुजन सम्राट सेनेच्या वतीनेही जिल्हाधिकार्याना निषेधाचे निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला . पिडीतेला न्याय मिळावा यासाठी बहुजन सम्राट सेना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुप, क्रांती रिक्षा सेना, रोजगार निर्माण परिषद आदी संघटनेने आंदोलनास पाठिंबा दिला. सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळत, हातात निषेधाचे फलक घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
पिडीत मुलीच्या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे. शासकीय मदत देण्यात यावी, घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावे आदी मागण्या या वेळी निवेदनामार्फत करण्यात आल्या.आज दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप झाला.
यावेळी बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम, क्रांती रिक्षा सेनेचे श्रीधर काळे, रोजगार निर्माण परिषदेचे बाबूराव मदने, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर ऊबाळे, सामाजिक कार्येकर्ते बाळासाहेब बरगले, हौसराव शिंदे,अशोक डोंगरे, मनोज खलसे, मनोज रिकीबे, सतीष जावळे , बबन जावळे, नसीर शेख आदी उपस्थित होते.