हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ वडगाव मावळ तहसीलदार यांना निवेदन…

0
119
(मावळ प्रतिनिधी )
मावळ दि. 2 :- उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे कु. मनीषा वाल्मिकी या 19 वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि उत्तर प्रदेश सरकारचा, पोलीस प्रशासनाचा गचाळ कारभार याचा निषेध, व धिक्कार करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आज, मावळ तालूका वडगाव येथील तहसील कार्यालयावर तथागत सोशल फाऊंडेशन ने कँडल मार्च मोर्चा काडून तहसील अधिकारी यांना निवेदन दिले.
मावळ तालुक्यातील तथागत सोशल फाऊंडेशन चे सदस्य विशाल मोरे, अतुल वाघमारे, अजय भवार, ऋषिकेश कदम तसेच सर्व सदस्यांनी मिळून वडगाव येथील पोटोबा मंदिरातपासून ते तहसील कार्यालया पर्यंत कँडल मार्च मोर्चा शांततेच्या मार्गाने आणि कोरोना ची परिस्थिती लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सचे पालन करत जाऊन तहसील कार्यालयाच्या गेटवर शांत आंदोलन केले. अनेक तरुणांनी पीडितेवर झालेल्या आत्याचाराची चीड व्यक्त करत आरोपीना फाशी झालीच पाहिजे, उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करत महिलांना सुरक्षितता मिळावी अशी मागणीही करण्यात आली. त्यावेळी तथागत सोशल फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.