Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्रहाथसर बलात्कार प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी द्या:करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी...

हाथसर बलात्कार प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी द्या:करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी…

सोलापुर,करमाळा, प्रतिनिधी,
दी.०१/१०/२०२०

करमाळा:-हाथसर बलात्कार प्रकरणातील दोषींना तात्काळ फाशी द्या अशी मागणी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवन्यात आले आहे.सदर निवेदनात पुढं म्हटले आहे की,उत्तरप्रदेशात हाथसर येथे अल्पवयीन मागासवर्गीय मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे हातपाय तोडून जीभ कापून टाकली आहे.त्यात तिचा जीव गेला आहे.पोलिसांनीही तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यसंस्कार केले आहेत.हे सर्व संशयास्पद आहे.हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न अधिकारी वर्गाकडून झाल्याची शक्यता आहे .
त्यामुळे यामध्ये अडकलेल्या सर्व नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीनभाऊ झिंजाडे,राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोजराज सुरवसे,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, राष्ट्रवादी obc सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय अडसूळ,युवा नेते आशपाक जामदार,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश काळे पाटील,शहर उपाध्यक्ष केतन कांबळे,चंद्रकांत जगदाळे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश वाघमारे,शहर कार्याध्यक्ष ओंकार पलंगे,सिध्दांत कांबळे,ओम कांबळे यांच्या सह्या आहेत.

देशातील विविध राज्यात बलत्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.महिला,मुलींच्या संरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार गंभीर नाही.बलात्कारासारख्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत.
- Advertisment -

You cannot copy content of this page