Thursday, September 12, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालिवली मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते " Swift zxi...

हालिवली मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते ” Swift zxi ” हि नविन गाडी लॉन्च !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हालिवली ग्रामपंचायत हद्दीतील चार फाटा येथे सिमरन मोटार शोरूम असून आज या कंपनीच्या नवीन मॉडेल बनविण्यात आलेल्या ” Swift zxi ” हि नविन चार चाकी गाडी हालिवली ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली . अतिशय सुरेख दिसणारी हि गाडी चांगल्या दर्जाची असून मार्केटमध्ये याला नक्कीच पसंती मिळणार आहे.

यावेळी या कार्यक्रमात मा. सरपंच सौ प्रमिला सुरेश बोराडे यांच्या समवेत , कंपनीचे येथील आउटलेट मॅनेजर महेश नागोटणेकर , ब्रॅंच मॅनेजर प्रशांत आंग्रे , सर्विस मॅनेजर हरेश साळुंखे , टीम लिडर अक्षय भोसले (सेल्स) , तसेच मा. विभागप्रमुख सुरेश बोराडे व इतर स्टाफ उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page