हालिवली सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांचा वाढदिवस लोकपयोगी कार्यक्रमाने साजरा..

0
269

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
सामाजिक कार्याचा वसा घेऊन थेट जनतेनेच आपल्याला निवडून दिलेले असल्याने आपणही जनतेचे देणेकरी आहोत,या उद्दात्य भावनेने दरवर्षी आपला वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करणारे कर्जत तालुक्यातील शहराच्या अगदी जवळ असलेल्या हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपला गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

कोरोना काळ असल्याने त्यांनी यावर्षी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.वाढदिवसानिमित्ताने त्यांनी नसरापूर ग्रामपंचायत मधील गणेगाव येथील साई संस्कार ट्रस्टला भेट दिली,व तेथील मंदिराची,परीसराची सेवा व देखभाल करणारे बाबा ,तसेच इतर मंडळी व पाहुण्यांना नाश्त्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना संसर्ग काळात त्यांनी गोरगरीब,गरजू नागरिकांना राशन धान्य व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप ,मास्क, सॅनिटायझरचे वाटप ,शाररिक तपासणी यांसारखे उपक्रम राबवून आपले वाढदिवस साजरे केले.तसेच यावर्षी हालिवली ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मिशन अंतर्गत महिलांसाठी चार सार्वजनिक शौचालयांचे भुमीपुजन सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना मा.विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्या प्रयत्नाने स्वच्छता अभियाना अंतर्गत त्यांनी शौचालय मंजूर करून आणले आहेत.यावेळी सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना राजकीय , धार्मिक , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच त्यांचे मित्रपरीवार,नातेवाईक , ग्रामस्थ ,उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामसेवक यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच ग्रामस्थांकडून दोघा पती – पत्नीचे तोंड भरून कौतुक व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तर थोरामोठयांनी त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशिर्वाद दिले.यावेळी सरपंच सौ . प्रमिला बोराडे यांनी माझ्या हातून अशीच जनसेवा होण्यासाठी तुमची साथ सदैव राहू द्या , असे मत मांडून सर्वांचे त्यांनी आभार मानले.यावेळी सरपंच प्रमिला बोराडे , मा.विभाग प्रमुख सुरेश बोराडे, उपसरपंच केतन बोराडे, ग्रामस्थ सखाराम बोराडे,म्हसे बाबा,महादेव राणे,गजानन बोराडे, विलास बोराडे, मनोहर बोराडे, सौ.उमाताई बोराडे, शोभा बोराडे, मनिषा बोराडे, रेणुका बोराडे आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.