भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायत येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२१ मोठया उत्साहात साजरा झाला.यावेळी थेट सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी हालीवली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ . प्रमिला बोराडे यांच्या शुभहस्ते प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.मा. विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.तसेच जमलेल्या इतर मंडळींनी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर सरपंच सौ . प्रमिला बोराडे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत,ध्वजगीत गाऊन तिरंगी ध्वजाला सलामी देण्यात आली.तसेच भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी विभागप्रमुख सुरेश बोराडे , पाटील सर , ग्रामसेविका सिमा राठोड , प्रमिलाताई दिनकर,उपसरपंच केतन बोराडे,सदस्य दत्ता मणेर,सारीका हांडे ,दर्शना बोराडे ,सुवर्णा बोराडे ,मेघा बोराडे , ग्रामपंचायत कर्मचारी सोपान बोराडे, मनोहर बोराडे व ग्रामस्थ शंकर म्हसे , गजानन बोराडे , जनार्दन राणे , सखाराम बोराडे , दत्ता राणे , बंडु राणे , मनोहर मणेर , संदिप बोराडे , दिलीप हांडे , मकरंद बडेकर आदी त्याचप्रमाणे इतर ग्रामस्थ या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते .