सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे व मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
समाजोपयोगी कामांतून कल्याणकारी योजना राबवून ग्रामविकासाचा ध्यास घेतलेल्या कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी आज अनेक विकास कामांचे भूमीपूजन त्यांच्या व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यामुळे गावाचा कायापालट होणार असून गावाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.आज दि.०९ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ – ०० वाजता ग्रामपंचायत हद्दीतील हालीवली गावात अनेक विकास कामांचा भुमीपुजनचा कार्यक्रम संपन्न झाला.
हालिवली ग्रामपंचायत ग्रामनिधीतून ग्रामस्थ मंगल बोराडे ते अनिल बोराडे यांच्या घराजवळील गटार तयार करणे , सुयोग सोसायटी मधील गटार तयार करणे ,तर आमदार निधीतून हालीवली ग्रामदेवता श्री भैरवनाथ मंदिरा समोरील पेवरब्लॉक रस्त्यासाठी पाच लाखाचा निधी मंजूर झालेला आहे.या तीनही कामांचे आज भुमीपुजन कार्यक्रम हालिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या समवेत शिवसेना रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , कर्जत पंचायत समितीचे मा.उपसभापती मनोहर थोरवे , मा.विभाग प्रमुख सुरेश बोराडे, शाखाप्रमुख तथा उपसरपंच केतन बोराडे, उपशाखा प्रमुख राजेश जाधव,ग्रा.क.संदिप बोराडे,विजय हांडे , जालिंदर बोराडे, मा.उपसरपंच संतोष बोराडे,विश्वनाथ राणे,तुकाराम शिंदे प्रविण बोराडे,जयवंत बोराडे,दत्ता मणेर,सुभाष बोराडे, जयेश बोराडे, भालचंद्र जाधव आदि मान्यवर व अनेक ग्रामस्थ ,महिलावर्ग उपस्थित होते.
येत्या दोन वर्षात हालीवली गावातील संपूर्ण गटारांची कामे करण्यात येणार आहेत व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी इतर कामे करण्याचा मानस असल्याचे हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी मत व्यक्त केले.