Thursday, October 10, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडहालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचा अखंड हरिनाम सप्ताह यांनी केला गौरव...

हालीवली सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांचा अखंड हरिनाम सप्ताह यांनी केला गौरव…

सरपंच असाव्या तर अश्या , ज्यांचे कार्य गाजतय दाही दिशा !

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
एक महिला सरपंच असूनही आपल्या पंचक्रोशीतील नागरिकांच्या समस्या जाणून त्या चुटकीसारख्या सोडविण्यात यश मिळवून शासनाच्या नवनवीन योजना आपल्या गावात राबवून गेले दोन वर्षात हालिवली ग्रामपंचायतीचा कायापालट करणाऱ्या हालीवली गावाच्या सौ.प्रमिला सुरेश बोराडे या प्रचंड बहुमताने थेट सरपंच म्हणून निवडून आल्यावर आणि पदभार हाती घेताच त्यांनी विकासाची गंगाच जणू हालिवली गावात आणली आहे.त्यांचे विकास कार्य अविरत चालुच आहे.

गावाचा विकास हाच त्यांचा जणु ध्यास आहे “.त्यामुळे त्यांचे कार्य कर्जत तालुक्यात दाही दिशा गाजत आहे.सरपंच सौ.प्रमिला बोराडे या काँलेज जिवनापासूनच उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आल्या .कबड्डी ,खो खो,भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक , धावणे, अशा स्पर्धेत विजयी होत बक्षिसांचा डोंगर रचून संपूर्ण कॉलेजची चँम्पियन म्हणून त्या गौरविल्या होत्या.समाजसेवेची आवड असल्यामुळे सिव्हिल डीफेन्स त्यांनी केले.Nss, च्या कार्यात सहभाग, N.c.c. च्या तीनही परीक्षा ते उत्तीर्ण आहेत.

पाषाणे माहेर येथून गाडीची सोय नसताना त्यांनी खूपच खडतर प्रवास करून शिक्षण पूर्ण केले आहे.बदलापुर आदर्श कॉलेज , उल्हासनगर आरकेटि कॉलेज , तिथे ncc व रायफल ट्रेनिंग त्यांनी घेतली आहे.लग्नानंतर एम.ए.केले व नंतर बी.एड. करून १० वर्ष विनाअनुदानित शाळेत सेवा केली.आदर्श शिक्षिका, उपक्रमशिल शिक्षिका म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे . शारदा मंदिर शाळेच्या ग्रंथालयात पुस्तके खुप कमी असल्याने मुख्याध्यापकांच्या परवानगीने विद्यार्थ्यांना घेऊन घरोघरी विद्येचा,ज्ञानाचा जोगवा देखील त्यांनी मागितला.

शाळेच्या वेळे व्यतिरीक्त अधिक थांबून जे अभ्यासात मागे विद्यार्थी होते त्यांना शिकवून त्यांना प्रगती पथावर आणून निस्वार्थी सेवा त्यांनी केली आहे.आजही बाजारात जाताना एखादा विद्यार्थी वाकून नमस्कार करतो तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती मिळाल्याचे समाधान त्यांना होते.उच्चशिक्षित असल्याने उत्तम भाषाशैली, वक्तृत्व यामुळे अनेक सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,सांस्कृतिक व्यासपिठे त्यांनी गाजविली आहेत.अध्यात्मिक विषयाची आवड असल्यामुळे सासर आणि माहेरच्या गावात पहिली महिला प्रवचनकार म्हणून त्यांची ओळख आहे.क्रांतिकारी विचारांच्या त्याअसल्यामुळे सतत नाविन्याचा ध्यास व शोध त्या घेत असतात.

गावातील महिलांचे त्या प्रेरणास्थान असून कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले अशावेळी महिलांना रोजगार मिळावा या हेतुने महिला गृह उद्योगाची सुरूवात त्यांनी केली.अनेक महिलांनी त्यानंतर छोटेमोठे उद्योग सुरू केले आहेत. सरपंच म्हणून निवडणुकीच्या वेळी जी आश्वासने दिली होती ती अवघ्या काही दिवसांतच पुर्ण केली.महिलांचा डोक्यावरील हंडा खाली उतरविला.घरोघरी मागेल तिथे नळ योजना शंभर टक्के पुर्ण केली. रस्ते ,गटारे,आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, वीज ,युवकांना प्रशिक्षण, विधवा महिलांना मानधन,अपंगांना सहाय्य, आदिवासी विकास योजना,बालविकास योजना,महिलांचे सशक्तीकरण,शैक्षणिक सहाय्य, शोषखड्डे , पंतप्रधान किसान योजना शंभर टक्के राबविली.अनेक शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून दिला.

शेतकरी,ग्रामस्थांना कृषी खात्याकडून पाठपुरावा करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले . कोरोना काळात अनेक उपाय योजना राबवून गावाला सुरक्षित ठेवले . जंतुनाशक फवारणी,टेंपरेचर मशीनद्वारे चेक अप,गावात प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन केले , सँनिटायझर,मास्क वाटप,धान्य वाटप,ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले.अतिवृष्टी , कोरोना काळ , महापुरात गरीब – गरजू कुटुंबाला धान्यवाटप केले. पती श्री.सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने गावातील रिक्षा चालकांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.कोरोनाकाळात ” बँक तुमच्या दारात ” हि पोस्टाची योजना राबविली.

महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले.महाड पुर परिस्थितीत त्यांनी त्या संचालक असलेल्या जोगेश्वरी महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू , कपडे इ.मदत पाठविली.गावात ऐक्य भावना वाढावी म्हणून स्वखर्चाने पुढाकार घेऊन नवरात्र उत्सव पहिल्यांदाच घरी सुरू केला व नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.अशा कर्तबगार महिला सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांची अखंड हरीनाम सप्ताह अध्यक्ष,प्रवचनकार, किर्तनकार , समाज प्रबोधनकार श्री.बाळकृष्ण महाराज बडेकर यांनी भेट घेऊन त्यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले तसेच तुमच्या सारखे सरपंच म्हणजे आमच्या परीसराची,गावाची शान आहे.

तुम्ही या गावाच्या सुनबाई नसून लेकच आहात , असे भावनात्मक उदगार काढून तुमचा आम्हाला अभिमान आहे , तुमच्यामुळे हालिवली गावाचे तसेच परीसराचे नाव तालुक्यात घेतले जात आहे .तुम्ही पुढे चला आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत , असे गौरव उद्गार बडेकर महाराज यांनी काढले.तसेच कीरवली अखंड सप्ताहाचे व्यासपीठ यापुढे तुमच्या साठी खुले असेल.आणि यापुढे दरवर्षी किरवली सप्ताहात तुम्ही प्रवचन करायचे तसेच दरवर्षी दिपोत्सवाच्या कार्यक्रमाला हि येण्याचे आग्रहाचे आमंत्रण करण्यात आले.


आईवडीलांची सेवा ,सासरची पुण्याई आणि पतीचे कर्तृत्व व भावकीचे,गावकीचे आशिर्वाद म्हणुनच सरपंच पदी विराजमान होऊन मला हि सेवेची संधी मिळाली आहे. मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे आणि ती मी सदैव करत राहिन.मी प्रखर देशभक्त,जिजाऊंची लेक आहे.मी एकटी नाही , छत्रपतींचे शिव विचार माझे पाठीशी आहेत. त्यामुळे वाटेत कीतीही अडथळे आले तरीही हे देशसेवेचे व्रत माझे कर्तव्य समजून प्रामाणिकपणे मी करत राहिन. असे मत हालीवली थेट सरपंच सौ .प्रमिला सुरेश बोराडे यांनी व्यक्त केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page