हाल आदिवासी वाडीतील कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

0
80

श्री सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम…..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यातील हाल ग्रामपंचायत हद्दीतील हाल आदिवासी वाडीतील गोर गरीब गरजू कुटूंबाना श्री सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

देशात सगळीकडे कोरोना महामारीने हाहाकार उडवला असून सगळी कडे लॉक डाऊन जाहीर सरकारने केले होते, यामुळे सगळ्यांचा कामधंदा बंद पडला असून यमध्ये गोर गरीब आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले होते ती परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे, या कोरोना साथीच्या काळात मुबंई गोरेगाव येथील श्री सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री सिद्धेश्वर महागणपती मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने अनेक गोर गरीब गरजू नागरीकांना वेळोवेळी मदत करण्यांत आली.

त्याचप्रमाणे आजही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत खालापूरातील हाल आदीवासी वाडीतील आदिवासी बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री सिद्धेश्वर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नरेश पटेल, सचिव केतन दळवी, खजिनदार मिलिंद आरेकर, किशोर जायसवाल सुनील कांचन अजय सावंत, तेजस दळवी, मानस दळवी, दत्ताराम देसाई, आमोद लोके, सिद्धेश माने, प्रसाद शिंदे, विलास गमरे, सुनील टीकम, प्रसाद नाईक, गिरीश गांधी, महेश माहेश्वरी, शशिकांत हिरे हाल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अजीम मांडलेकर आदीसह आदिवासी बांधव उपस्थित होते.