Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे " यांच्या जयंती निमित्त महा आरोग्य...

” हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या जयंती निमित्त महा आरोग्य शिबीर !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत रहावे , म्हणून नेहमीच काळजी घेणारे , कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट ” यांच्या संयुक्त विद्यमाने ” महाआरोग्य शिबीराचे ” आयोजन रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शिवतीर्थ हॉल – पोसरी, ता. कर्जत, जि. रायगड येथे केले असून या महाआरोग्य शिबिरात अनेक आजारांवर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार असून , याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सर्वांना केले आहे .या शिबिरास पद्यश्री डॉ. तात्याराव लहाने ,किशोर मासुरकर , अंकुश जैन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदी शस्त्रक्रिया , ई.सी.जी., बी.पी.आणि शुगर तपासणी , सामान्य तपासणी हाडांचे आजार , पाठदुखी , मानदुखी , हात आणि पायाच्या मुंग्या, स्त्रीरोग इ. , मोफत तपासणी व सल्ला – दंत चिकित्सा, तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मधुमेह , ईसीजी आणि हृदय रक्तदाब, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा, डोळे आणि मोतीबिंदू , खुरटे पाऊल, दुभंगलेले ओठ व फाटलेले टाळू, हाडांची घनता आदीं . मोफत चष्मा, सॅनिटरी पॅड्स, औषधे वितरण करणार आहेत . तर महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची मोफत तपासणी करणार आहेत.

या महाआरोग्य शिबिरात तपासणी करण्यास येणाऱ्या नागरिकांनी व रुग्णांनी येताना आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स घेऊन यावे . बीपी आणि शुगरची तसेच इतर औषधे सुरु असल्यास ती देखील घेऊन यावी.अधिक संपर्कासाठी /नोंदणीसाठी अक्षय शिंगटे – 8975357609 , प्रशांत पाटील 9225929752 , जयेश जाधव – 8169578053 ,भरत थोरवे – 7350535505 , अशोक कांबेरे – 9762370037 , संजय चवरे – 8087240505 , सतीश कडू – 9604855780 , नवनीत कदम – 9209276632 , प्रभाकर भोसले – 9049250505 संपर्क करावा.

तरी या महा आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे – कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page