![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
भिसेगाव – कर्जत( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित रहाण्यासाठी नेहमीच झटणारे कार्यसम्राट – दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज कंळब जिल्हा परिषद वार्ड मध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने पार पडले.या महाआरोग्य शिबिरात परिसरातील अनेकांनी लाभ घेतला.
कर्जत तालुक्यातील कंळब जिल्हा परिषद वार्डमध्ये पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी स्थानिक नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद पाहता नोंदणीकृत ५०० + तसेच २०० असे एकुण ७०० हुन अधिक नागरीकांनी व महिला वर्गानी ह्या महाआरोग्य शिबिराचा विविध आजारांवर व नेत्रशल्यचिकित्सा तसेच आयुष्यमान भारत , आभा कार्ड ,आशा सुविधा चा लाभ घेतला असुन आपल्या पहिल्याच शिबिरासाठी अपेक्षा पेक्षा जास्त प्रतिसाद मिळाले , असे कळंब प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डाॅक्टर, आरोग्य सेवक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले.ह्या महाआरोग्य शिबिरात माजी उपसभापती मनोहरशेठ थोरवे , विधानसभा संघटक शिवरामदादा बदे ,कर्जत ता.समन्वयक रमेश मते , उपतालुकाप्रमुख भरत डोंगरे , माजी सभापती राहुल विशे , उपविभाग प्रमुख भानुदास राणे , रविंद्र ऐनकर , योगेश बदे , सरपंच प्रमोद कोंडीलकर , ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश बदे , प्रसाद बदे , मुसा पाटील , माजी सरपंच फाईक खान , प्रशांत पाटील , अक्षय शिंगटे , किशोर धुळे , कैलाश जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते , तर कळंब जिल्हा परिषद वार्ड मधील शिंदे गटाच्या अनेक शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शोऐब भाई , भरत डोंगरे , पिंटू , प्रशांत पाटील , अक्षय शिंगटे , तेजस गायकर , संजय चवरे , हरेश सोनावळे , थोरवे भाऊ यांनी ही ह्या शिबिरासाठी मोलाची कामगिरी बजावली.
आशा वर्कर यांनी ही आपआपल्या गावातून अनेक गरजूंना ह्या शिबिराची सुविधाचा लाभ मिळवून देण्यासाठी नागरीकांना सहकार्य केले .यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.